स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला 'लॉक अप’चा विजेता

शनिवारी रात्री या शोचा ग्रँड फिनाले झाला ज्यामध्ये होस्ट कंगनाने मुनव्वरच्या नावाची विजेता म्हणून घोषणा केली.
Munawar Faruqui
Munawar FaruquiSaam Tv

मुंबई - कंगना रणौतच्या लॉक अप या रिअ‍ॅलिटी शोची जोरदार चर्चा सुरु आहे. OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो लॉकअपच्या पहिल्या पर्वाच्या विजेत्याचे नाव घोषित करण्यात आले आहे. पायल रोहतगीचा पराभव करून प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा या शो चा विजेता ठरला. सर्वाधिक मते मिळाल्याने तो या शो चा विजेता ठरला. शनिवारी रात्री या शोचा ग्रँड फिनाले झाला ज्यामध्ये होस्ट कंगनाने मुनव्वरच्या नावाची विजेता म्हणून घोषणा केली.

मुनव्वरला बक्षीस म्हणून एक ट्रॉफी, २० लाख रुपये आणि मारुती अर्टिगा कार देण्यात आली. याशिवाय शोद्वारे त्याला इटलीला फिरायला जाण्याची संधीही मिळणार आहे. तसेच या शोमध्ये मुनव्वरने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक धक्कादायक खुलासा केले. विजयी झाल्यानंतर मुनावर फारुकीने आयोजक आणि त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Munawar Faruqui
Beed Accident: अंगावरून पिकअप गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू...

हा शो २७ फेब्रुवारीला सुरु झाला. या शो मध्ये जवळपास २० स्पर्धक सहभागी झाले होते. यात अनेक बड्या कलाकारांच्या नावाचा समावेश होता. कंगनाने हा शो होस्ट केल्याने सुरुवातीपासूनच हा शो चर्चेचा विषय ठरला होता. शो च्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये अंजली अरोरा, पायल रोहतगी आणि मुनव्वर फारुकीचा समावेश होता. अखेर सर्वाधिक मते मिळाल्यानंतर मुनव्वर फारुकीला या शोचा विजेता घोषित करण्यात आले. तर पायल रोहतगी ही फर्स्ट रनरअप ठरली.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com