Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: बबितावर आले संकट, जर्मनीमध्ये झाली मोठी दुखापत

मुनमुन दत्ता नुकतीच युरोपमध्ये फिरायला गेली होती. पण दुर्दैवाने घरी परतत असताना जर्मनीत अभिनेत्रीला दुखापत झाली.
Munmun Dutta had accident in Germany
Munmun Dutta had accident in GermanySaam Tv

Munmun Dutta Accident: टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला नजर लागली आहे. या शोमध्ये जेठालालचे वडील 'चंपक चाचा' यांची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्ट यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. आता या मालिकेतील ग्लॅमरस अभिनेत्री मुनमुन दत्ताचा सुद्धा अपघात झाला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना अपघाताची माहिती दिली.

मालिकेमध्ये बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता नुकतीच युरोपमध्ये फिरायला गेली होती. पण दुर्दैवाने घरी परतत असताना जर्मनीत अभिनेत्रीला अपघात झाला. मुनमुनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये याविषयी सांगितले आहे, 'जर्मनीमध्ये एक छोटासा अपघात झाला. माझा डावा गुडघा खूप दुखत होता. त्यामुळे मला माझा सहल संपवून घरी परतावे लागत आहे.

Munmun Dutta had accident in Germany
Jason David Frank: सर्वांच्या लाडक्या 'पॉवर रेंजर' फेम अभिनेत्यानं संपवलं जीवन, वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दोनच दिवसांपूर्वी मुनमुन स्वित्झर्लंडमधील इंटरलेकन येथून ट्रेनने जर्मनीला गेली होती. तिने आवडलेल्या काही मजेदार खाद्यपदार्थांची छायाचित्रे देखील शेअर केली. जर्मनीला जाण्याआधी मुनमुन स्वित्झर्लंडला गेली होती. जे बहुतेक रोमँटिक चित्रपटांसाठी आवडते ठिकाण आहे. अभिनेत्रीने इथून हॉट चॉकलेट खातानाचा फोटोही शेअर केला होता. (TV)

मुनमुनने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये विचारले होते, 'किती जास्त म्हणजे सगळ्यात जास्त, किती हॉट चॉकलेट हवं आहे?' आणि म्हणाली, "माझ्या मते काही फरक पडत नाही कारण 'अशा छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या देशांमध्ये घडत राहतात'." अभिनेत्रीने लिंड म्युझियमलाही भेट दिली आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले आहे, "चॉकलेटच्या लिंट होमला भेट" (Video)

मालिकेत बापूजींची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्टचाही शूटिंगदरम्यान अपघात झाला होता. नुकतीच बातमी आली की त्याने शूटिंगला येणे थांबवले आहे. तसेच एका भीषण अपघातात त्याला खूप दुखापत झाली. या अफवांमुळे त्रस्त झालेल्या अमित भट्ट यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सत्य सांगितले.

अमित भट्ट म्हणाले- 'काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या भीषण अपघाताच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. मला सांगायचे आहे की या बातम्या खोट्या आहेत. मला काहीही झालेले नाही. मला किरकोळ दुखापत झाली आहे. मी पूर्णपणे ठीक आहे आणि तुमच्या समोर आहे. (Social Media)

Munmun Dutta Instagram Story
Munmun Dutta Instagram StorySaam Tv

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com