
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या जादुई संगितानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे संगीत दिग्दर्शक प्रीतमदा(Pritam) पुन्हा एकदा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील 'केसरिया'(kesariya) या गाण्यामुळे चर्चेत आले आहेत. सिनेमाचे हे गाणे निर्मात्यांनी रीलीज केल्यापासून या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. गाणे रीलीज होऊन फक्त ६ दिवस झाले आहेत आणि आतापर्यंत ६२ दशलक्ष व्ह्यूजसह गाण्याला खूप पसंती मिळत आहे. हे गाणे आतापर्यंतचे सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे ठरले आहे, असा दावा केला जातोय. हे गाणे रीलीज झाल्यानंतर प्रीतमदा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
'ब्रह्मास्त्र' हा आगामी सिनेमा खूप चर्चेत आहे. संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. अलीकडेच त्यांनी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'केसरिया' या गाण्यावर आपले मत मांडले.
संगीत दिग्दर्शक प्रीतमदा यांनी सांगितले की, 'केसरिया' गाणे लोकांना खूप आवडते याचा मला खूप आनंद आहे. यामध्ये आलिया आणि रणबीर दोघेही अप्रतिम दिसत आहेत. बहुतेकदा मी रणबीरला सांगत असतो की, तुझ्यावर चित्रित केलेले कोणतेही गाणे फ्लॉप असू शकत नाही. विशेषत: प्रेमगीते, तू त्या गाण्यातून ज्या प्रकारे भावना व्यक्त करतोस, ते स्क्रीनवर पाहायला खूप सुंदर वाटते'.
'रणबीर ज्या पद्धतीने गाणे सादर करतो, त्यावेळीस गाण्यावर त्याचा प्रभाव असतो, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. त्याला वाद्यांची समज आहे, तो लिपसिंगमध्ये उत्तम आहे. गाणे तो स्वतः गात असल्याचे नेहमी दिसते. मी त्याला इतक्या वर्षांपासून पाहतोय. जेव्हा तो साउंड स्टुडिओमध्ये येतो. मी त्याला कधीही कोणावर दबाव आणताना पाहिले नाही. तो खूप हुशार आहे आणि तो अगदी सहजपणे योग्य प्रतिक्रिया देतो. तो कधीही वादात पडत नाही. दिग्दर्शकाचा दृष्टिकोन नेहमी समजून घेऊन त्याचा आदर करत तो आपले काम करतो, असे प्रीतमदा रणबीरचं कौतुक करताना म्हणाले.
प्रीतम दा यांनी 'ब्रह्मास्त्र'मध्ये फक्त हिंदीतच नव्हे तर तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही संगीत दिले आहे. दक्षिणेतही प्रीतमदांची रचलेली ही धून सर्वांना पसंत पडत आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.