सुरांचा 'सिलसिला' थांबला! प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

संतूर वाद्याला लोकप्रियता मिळवून देण्यात मोठे योगदान असलेले प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार यांचे निधन झाले
सुरांचा 'सिलसिला' थांबला! प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन
santoor legend Pandit Shivkumar SharmaSAAM TV

मुंबई: देशभरातच नव्हे, तर जगभरात संतूर या वाद्याला म्युझिकल इन्स्ट्रूमेंट म्हणून लोकप्रिय करणारे आणि भारतीय शास्त्रीय संगीताला नव्या उंचीवर पोहोचवण्यात मोठं योगदान असलेले प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (Shivkumar Sharma) यांचे आज, मंगळवारी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. पंडित शिवकुमार शर्मा यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. त्यांच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

santoor legend Pandit Shivkumar Sharma
Lata Mangeshkar : लता मंगेशकरांचे 'हे' स्वप्न लवकरचं पूर्ण होणार !;पाहा व्हिडीओ

पंडित शिवकुमार शर्मा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये संतूर या वाद्याला एक म्युझिकल इन्स्ट्रूमेंट म्हणून ओळख दिली. त्यानंतर त्यांनी हे वाद्य देशभरातच नाही तर, जगभरात प्रसिद्ध केले. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राला एका नव्या उंचीवर पोहोचवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत संगीत दिलं. दोघांची जोडी ही शिव-हरी म्हणून ओळखली जात होती. त्यांनी 'सिलसिला', 'लम्हे' आणि 'चांदनी' यांसारख्या चित्रपटांना दिलेल्या संगीतामुळं चार चाँद लावले.

पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म काश्मीरमधील संगीत (Music) क्षेत्राशी जोडलेल्या कुटुंबात १९३८ साली झाला होता. त्यांनी संगीताचं शिक्षण सुरुवातीला आपल्या वडिलांकडूनच घेतलं. संगीत क्षेत्रात काम करत असतानाच, वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी 'जम्मू रेडिओ'मध्ये प्रसारकाची नोकरीही केली. १९५५मध्ये मुंबईच्या एका कार्यक्रमात त्यांना संतूर वादनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांना खरी ओळख मिळाली, असे सांगितले जाते.

santoor legend Pandit Shivkumar Sharma
Lata Mangeshkar Special : लता मंगेशकर : एक संजीवन स्वर ;पाहा हा Special Report !

अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर

पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९८५ मध्ये बाल्टिमोर या संयुक्त राज्याचे मानद नागरिकत्वही त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

चित्रपटसृष्टीत 'सिलसिला'पासून कारकिर्दीला सुरुवात

शिवकुमार शर्मा यांनी १९६७ साली बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित बृजभूषण काबरा यांच्यासोबत 'कॉल ऑफ द व्हॅली' या अल्बममध्ये काम केलं. हा शास्त्रीय संगीतातील एक प्रसिद्ध असा अल्बम आहे. चित्रपटसृष्टीत त्यांनी १९८० साली 'सिलसिला' या चित्रपटातून सुरुवात केली. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत अनेक चित्रपटांत त्यांनी संगीत दिलं. या जोडीला शिव-हरी या नावाने प्रसिद्धी मिळाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com