Myra Vaikul Viral Video: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' म्हणत मायरा वायकुळने वाजत-गाजत आणला बाप्पा

Myra Vaikul Ganpati Celebration: मायरा वायकुळने तिच्या घराचा बाप्पा नाचत-गाजत आणला आहे.
Myra Vaikul Ganesh Chaturthi Celebration
Myra Vaikul Ganesh Chaturthi Celebration Saam TV

Myra Vaikul Post:

गणपती बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या भक्तीत सगळे दंगून गेले आहेत. बाप्पाच्या आगमनावेळी रंगतात ती बाप्पाची गाणी. अशाच एका गाण्याने साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' हे गाणं महाराष्ट्रभर गाजत आहे. लहान-थोर सगळी मंडळी या गाण्यावर रील बनवत आहेत. सगळ्यांची लाडकी मायरा वायकुळने देखील या गाण्याच्या गजरात तिच्या घरी बाप्पा आणला आहे.

Myra Vaikul Ganesh Chaturthi Celebration
Riteish Deshmukh Post: रितेश देशमुखची लय भारी क्रिएटिव्हिटी! गॅरेजमधील टाकाऊ वस्तूंपासून साकारला बाप्पा

मायरा वायकुळने तिच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मायरा वायकुळचे पप्पा गणपती घेऊन येत आहेत. तर मायरा वायकुळने तिच्या घराचा बाप्पा ''आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर नाचत-गाजत आणला आहे.

मायरा वायकुळच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. मायरा 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर खूप छान डान्स केला आहे. हे गाणे व्हायरल होत असल्याने मायराचा हा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

याआधी मायरा आणि साईराजसोबत या गाण्यावर व्हिडीओ शेरा केला होता. साईराज आणि मायरा यांचं 'देवबाप्पा' हे गाणं काल प्रदर्शित झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com