Official Trailer: नागराज मंजुळे- सयाशी शिंदेंच्या ॲक्शनचा जलवा; 'घर बंदूक बिरयानी'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

Nagraj Manjule Upcoming Movie: 'घर बंदूक बिरयानी' हा झी स्टुडिओज निर्मित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Nagraj Manjule, Sayaji Shinde and Akash Thosar movie Ghar Banduk Biryani Official Trailer Out
Nagraj Manjule, Sayaji Shinde and Akash Thosar movie Ghar Banduk Biryani Official Trailer Out Saam TV

Ghar Banduk Biryani Official Trailer: दिग्दर्शक नागराज मंजुळे नेहमीच विविध धाटणीचे आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. लवकरच त्यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा झी स्टुडिओज निर्मित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये नागराज मंजुळे एक नव्या रूपात दिसणार आहेत. त्यांची ही भूमिका प्रेक्षक किती पसंत करतात हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आपल्याला कळेल.

नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे.

ट्रेलरमध्ये नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील दिसत आहेत. आशेच्या भांगेची नशा भारी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यातील चकमक दिसत आहेत. या थरारात एका तरुणाचाही सहभाग आहे. आता यांच्यात नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहे.

Nagraj Manjule, Sayaji Shinde and Akash Thosar movie Ghar Banduk Biryani Official Trailer Out
CID Producer: टीव्हीवर २० वर्षे गाजलेल्या CID मालिकेच्या निर्मात्याचे निधन; जवळच्या मित्रासाठी शिवाजी साटमची भावनिक पोस्ट

घर, बंदूक आणि बिरयानीचा ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत. तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे.

ट्रेलरमधील लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे पार्श्वसंगीत आणि ॲक्शन. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळते. यात कौटुंबिक छटा देखील दडली आहे. यात लव्हस्टोरी देखील आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील गाणी. ही गाणी भन्नाट लोकप्रिय होतात.

या चित्रपटातील तीन गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली असून या गाण्यांनीही अल्पावधीतच धुमाकूळ घातला आहे.लाखोंच्या वर व्ह्यूज मिळालेल्या या गाण्यांना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास यश मिळाले आहे. वैभव देशमुख यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

चित्रपटाबद्दल निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ''अतिशय भव्य स्वरूपात हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दिसताना खूप ओळखीचा विषय दिसत असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. मी पडद्यामागे आणि पडद्यावरही काम केले आहे.

अनेकांना प्रश्न होता की या चित्रपटाचे नाव असे काय? तर या चित्रपटाचे नाव अतिशय समर्पक असून ते चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल. यात काही मुरलेले कलाकार आहेत काही नवोदित कलाकार आहेत मात्र सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.''

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com