नाना पाटेकर यांची 'या' वेब सिरीजमधून होणार धमाकेदार एन्ट्री

नाना पाटेकर हे लवकरच धमाकेदार कमबॅक करणार आहेत. खुद्द नाना पाटेकरांनी याचा खुलासा केला आहे. पाटेकर हे प्रकाश झा यांच्या आगामी वेब सिरीजने ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहेत.
नाना पाटेकर यांची 'या' वेब सिरीजमधून होणार धमाकेदार एन्ट्री
nana patekar upcoming web series Saam Tv

मुंबई : जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे बरीच वर्षे चित्रपट (movie) जगतापासून दूर होते. नाना पाटेकर काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांच्या 'काला' आणि 'इट्स माय लाइफ' सारख्या चित्रपटांमध्ये दिसले होते. पण आता, नाना पाटेकर हे लवकरच धमाकेदार कमबॅक करणार आहेत. खुद्द नाना पाटेकरांनी याचा खुलासा केला आहे. पाटेकर हे प्रकाश झा यांच्या आगामी वेब सिरीजने(Web Series) ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहेत. ही एक सामाजिक व राजकीय विषयावर आधारित सिरीज असेल. एका वृत्तपत्राशी संवाद साधताना नाना पाटेकरांनी याचा खुलासा केला आहे.

nana patekar upcoming web series
Shamshera: लग्नानंतर रणबीर कपूरचा महाभयंकर अवतार होतोय व्हायरल, फॅन्स हादरलेच

याआधी एका मीडिया रिपोर्टनुसार समजले होते की, नाना पाटेकर आणि प्रकाश झा पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. या सिरीजचे नाव 'लाल बत्ती' असे आहे. या सिरीजमध्ये नाना पाटेकर एका राजनेत्याची भूमिका साकारणार आहेत. जे स्वतःच्या स्वार्थासाठी युवानेत्यांचा गैरवापर करतात. प्रकाश झा पुन्हा एकदा राजकारणाची काळी बाजू प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. आपल्या आजूबाजूला होणाऱ्या राजकारणावर भाष्य करणारी ही वेब सिरीज असणार आहे. या सिरीजचे चित्रीकरण सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये करण्यात येणार आहे.

nana patekar upcoming web series
जीव गुंतला...! सिद्धार्थ-कियाराचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल, एकमेकांमध्ये...

नाना पाटेकर साजिद नाडियाडवालासोबत करणार काम...

२०२० मध्ये नाना पाटेकरांच्या अजून एका ओटीटी वेब सिरीजची घोषणा करण्यात आली होती. फिरोज नाडियाडवालायांच्या वेब सिरीजमध्ये नाना पाटेकर 'रॉ' चे संस्थापक आर. एन.कोओयांचे पात्र साकारणार होते. पण त्यानंतर या सिरीज विषयी कोणतीही बातमी सामोर आली नाही.

नाना पाटेकरांच्या आगामी वेब सिरीजची निर्मिती जियो स्टुडिओ करणार आहेत. या सिरीजमध्ये अनेक मोठे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. नाना पाटेकरांनी शेवटचे माही गिल या अभिनेत्रीसोबत 'वेडिंग एनिवर्सरी' या चित्रपटात काम केले होते. त्याच वर्षी नाना पाटेकर रोहित शेट्टीच्या 'गोलमाल अगेन' या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून दिसले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com