नुपूर शिखरेचे जुने न्यूड फोटो व्हायरल; आमिर खानच्या मुलीला प्रपोज केल्यानंतर आलाय चर्चेत

नुपूर शिखरेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आमिर खानची मुलगी आयरा खानला प्रपोज करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Nupur Shikhare
Nupur Shikhare Saam Tv

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत लवकरच लग्नसोहळा पार पडणार असल्याचं समजत आहे. कारण नुकतेच सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेने बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सोशल मीडियावर देखील नुपूर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. सध्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि आयरा खानचा होणारा पती नुपूर शिखरे एका वेगळाच कारणाने चर्चेत आहेत.

Nupur Shikhare
Urfi Javed: का लपवते उर्फी चेहरा; व्हिडिओ चर्चेत

नुपूर शिखरेचा एक व्हिडिओ सोशल (Social) मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आमिर खानची मुलगी आयरा खानला प्रपोज करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नुपूर शिकरे आणि आयरा यांच्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत . असे असतानाच नुपूरचे काही जुने फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले ज्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

माहितीनुसार, नुपूर शिखरेचं न्यूड फोटोशूट झालं आहे. नुपूर शिखरेचा प्रपोजल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या जुन्या न्यूड फोटोशूटमधले फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये नुपूर शिखरेचं कोणतेही कपडे न घातलेले फोटो समोर आले आहेत. हे शूट त्याचे खूप जुने आहे त्याने २०१९ मध्ये न्यूड फोटोशूट केलं होतं. सोशल मीडिया अकाउंटवर त्याने फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तो गवतावर विवस्त्र मध्ये हटके पोज देताना दिसतो आहे.

नुपुल शिखरे फिटनेस फ्रीक आहे. नुपूरने जेव्हा हे फोटो शेअर केले तेव्हाही त्यावरून बराच गदारोळ झाला होता. ही छायाचित्रे शेअर करण्यासोबतच नुपूरने कॅप्शनमध्ये धावण्याचे फायदे सांगितले आहेत.

Edited By : Shraddha Thik

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com