69th National Film Awards Ceremony 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांची चर्चा, ‘गोदावरी’सह ‘एकदा काय झालं’ने मारली बाजी

National Awards 2023 Winners : २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूड मधील चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.
National Awards Winning Marathi Movie
National Awards Winning Marathi MovieSaam Tv

National Awards Winning Marathi Movie

भारतीय सिनेसृष्टीमध्ये मानाच्या समाजल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची’ घोषणा २४ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आली. ज्या चित्रपटांना आणि कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला होता, त्यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हा पुरस्कार सोहळा आहे. यावेळी मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले.

National Awards Winning Marathi Movie
Prashant Damle : अभिनेते प्रशांत दामलेंना 'विष्णुदास भावे गौरव पदक' पुरस्कार जाहीर

दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण चार मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ हा पुरस्काराने, तर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन’ या पुरस्काराने गौरविले. त्यासोबतच शेखर बापू रणखांबे या सांगलीच्या दिग्दर्शकाला ‘रेखा’ या माहितीपटासाठी ‘सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरी ॲवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी ‘रेखा’ या माहितीपटाच्या माध्यमातून उत्तम कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यांनी डॉक्यूमेंट्रीमध्ये, रस्त्याशेजारील राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यातील अडचणी, महिलांच्या मासिक पाळी, आरोग्याच्या वाईट स्थिती या गोष्टींवर भाष्य केलं आहे. या डॉक्यूमेंट्रीला ‘सामाजिक विषयावरील माहितीपट स्पेशल ज्युरी ॲवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी हजेरी लावली होती.

त्यासोबतच पुरस्कार सोहळ्यामध्ये, ‘सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट’ या पुरस्काराने एफटीआयआयचे सदस्य संदीप शहारे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक हिमांशू प्रजापती यांना ‘थ्रीटूवन’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

National Awards Winning Marathi Movie
Alia Bhatt Saree: लग्नानंतर आणखी एका खास क्षणांसाठी आलियाने केलं OUTFIT रिपीट, नॅशनल अ‍ॅवॉर्डदरम्यान अभिनेत्रींच्या साडीची चर्चा

बापाच्या पावलावर पाऊल ठेवू पाहणाऱ्या एका मुलाची कथा ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची कथा प्रत्येक बाप- मुलाला भावेल अशी आहे. ‘एकदा काय झालं’ या मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ या पुरस्कारांतर्गत गौरविण्यात आले. हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये प्रदर्शित झाला असून पुरस्कार स्विकारण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि गायक सलील कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती.

National Awards Winning Marathi Movie
Parineeti Chopra: हातात चुडा अन् ब्लॅक कलरचा स्विमसूट... मालदीवमध्ये एकटी काय करतेय परिणीती चोप्रा?

निशिकांत कुटुंबासोबत असलेला नात्यातील चढउतार, परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण 'गोदावरी' चित्रपटामध्ये मध्ये दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा 'गोदावरी' नदी भोवतीच फिरत असून नदीसोबतचे अनोखे नाते या चित्रपटातून उलगडत आहे. या मराठी बहुचर्चित चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ या पुरस्कारांतर्गत दिग्दर्शक निखिल महाजन यांना गौरविण्यात आले. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला असून पुरस्कार स्विकारण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी हजेरी लावली होती.

National Awards Winning Marathi Movie
Madhuri Dixit - Shriram Nene: 'आपला प्रवास नुकताच सुरू झालाय...' लग्नाच्या २४ व्या वाढदिवशी श्रीराम नेनेंनी पत्नी माधुरी दीक्षितसाठी केली खास पोस्ट

राष्ट्रीय पुरस्काराचा इतिहास

भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात १९५४ पासून झाली होती. हा पुरस्कार सोहळा भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून आयोजित केला जातो.

National Awards Winning Marathi Movie
Tula Shikvin Changlach Dhada: यळकोट यळकोट जय मल्हार! अक्षराला उचलून घेऊन अधिपती चढणार जेजुरीगड, लवकरच संसाराला करणार सुरूवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com