National Cinema Day : २३ सप्टेंबरला देशभरातील चित्रपटगृहे हाउसफुल्ल, तिकिटांची विक्रमी विक्री!

२३ सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात आहे.
National Cinema Day
National Cinema Day Saam Tv

मुंबई : २३ सप्टेंबर हा दिवस चित्रपट प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे, कारण या दिवशी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day) साजरा केला जात आहे. २३ सप्टेंबर रोजी देशभरातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांना केवळ ७५ रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. २३ सप्टेंबर रोजी प्रेक्षक विक्रमी संख्येने चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे वळतील अशी अपेक्षा आहे.

National Cinema Day
दीपिका पादुकोण 'पठाण' च्या कामात व्यग्र, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

मल्टीप्लेक्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (MAI) २३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त देशातील ४००० स्क्रीनवर केवळ ७५ रुपयांमध्ये चित्रपटाची तिकिटे खरेदी करण्याची ऑफर आणली आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शुक्रवारी प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये विक्रमी संख्येने आपली उपस्थिती नोंदवता येईल. या दिवशी चित्रपटाच्या तिकिटांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग खूप चांगले असल्याचे सांगितले जाते.

National Cinema Day
Sunny Deol Chup : पत्रकार परिषदेत पत्रकार प्रश्न विचारत होता, अचानक रागाने ओरडला सनी देओल!

मल्टीप्लेक्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (MAI) एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की चित्रपटाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग उत्कृष्ट झाले आहे आणि २३ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहे एका वर्षात सर्वाधिक प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवू शकतात.

देशभरातील सिनेसृष्टी 'राष्ट्रीय चित्रपट दिना'च्या माध्यमातून प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून त्यांना कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. मल्टीप्लेक्स अथॉरिटी ऑफ इंडियाने निवेदनात पुढे लिहिले की, 'PVR, INOX, Cinepolis, Carnival, Mirage, Citypride, Asia, Mukta A2, Movie Time, Wave, M2K आणि Delight सारख्या मल्टिप्लेक्सनेही या उपक्रमात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे.'

चित्रपटगृहे आणि तिकिटांच्या किंमतीबाबतच्या राज्य नियमांमुळे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ यासारख्या काही राज्यांतील चित्रपटगृहे 'राष्ट्रीय चित्रपट दिना'मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. दरम्यान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळसह सर्व राज्यांतील सिनेमा राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त विशेष ऑफर देणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com