नवाब मलिकांच्या आरोपांना एनसीबीचं प्रत्युत्तर

मुंबई- गोवा क्रूझवर रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली
नवाब मलिकांच्या आरोपांना एनसीबीचं प्रत्युत्तर
नवाब मलिकांच्या आरोपांना एनसीबीचं प्रत्युत्तरSaam Tv

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान Shahrukh Khan याच्या मुलाला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने NCB ने ताब्यात घेतले आहे. मुंबई- गोवा क्रूझवर रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यन खानची Aryan Khan एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. आर्यन खान बरोबरच ८ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश यामध्ये आहे.

हे देखील पहा-

अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच बुकिंग करुन, आणि नंतर क्रूझमध्ये प्रवेश मिळवला आहे. पार्टीला सुरुवात झाल्यावर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली आहे. क्रूझ मुंबई किनाऱ्यावर पोहोचले. तेव्हा मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा त्याठिकाणी तैनात करण्यात आला होता. NCB ने मिळालेल्या माहितीच्या आधारावर क्रूझवर ही कारवाई केली आहे.

नवाब मलिकांच्या आरोपांना एनसीबीचं प्रत्युत्तर
Aryan Khan Case: इम्तियाज खत्रीच्या घरावर NCBचा छापा

चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली नाही. कायद्याच्या चौकटीत राहून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १३ लोकांना NCB कार्यालयात आणलं होते. परंतु, या प्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आलं आहे. आणि ५ जणांविरोधात ठोस पुरावे नसल्यमुळे सोडून देण्यात आलं आहे. याच कारवाईच्या आधारच्या कायद्यानुसार विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत एका परदेशी नागरिकांला देखील अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.