Nawazuddin Siddiqui: 'तुला लाज नाही वाटत...' नवाजच्या कौटुंबिकवादात एका बॉलिवूड अभिनेत्याची उडी

नवाझुद्दीनच्या कौटुंबिक वादात बॉलिवूडचा अभिनेता आणि प्रसिद्ध युट्युबर के आर के अर्थात कमाल राशिद खाननं उडी मारली आहे.
Nawazuddin Siddiqui
Nawazuddin SiddiquiSaam Tv

Nawazuddin Siddiqui Trolled By KRK: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन शहा सध्या आपल्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या पत्नीनं आलियानं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आलियानं नवाझुद्दीनवर जे नाही ते आरोप करुन त्याच्याविषयी वेगळाच प्रचार सुरु केला आहे.

Nawazuddin Siddiqui
Shraddha Kapoor: श्रद्धाने विमानतळावर धरला चाहत्यासोबत ठेका, 'प्रमोशनसाठी काहीही...' म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

नवाझुद्दीनच्या असंख्य चाहत्यांना आलियानं जे काही आरोप केले आहेत त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे. याचे कारण, सिनेसृष्टीत संघर्ष आणि कष्टानं स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता अशी त्याची ओळख. प्रचंड हालाखीचे दिवस काढत नवाझुद्दीन सिद्दिकीने बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा कलाकार म्हणून अशी ओळख केली आहे.

नवाझुद्दीनच्या आईने देखील सुरुवातीला सुनेविरोधात आरोप केले होते. नवाझुद्दीनच्या आईने आपल्या सुनेला संपत्तीतून बेदखल करण्याचा तिने निर्णय घेतला होता. नवाझुद्दीनच्या मुलांवरुन देखील त्याच्या आईनं आलियावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या नवाझुद्दीन आणि आलियाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याबाबत कोर्टानं देखील त्यांना मुलांसाठी एकदा त्यांच्यातील वादावर विचार करण्याचा सल्ला दिला.

Nawazuddin Siddiqui
Akshay Kumar In Trend: अक्षय कुमारच्या पदरात यश आणि अपयश एकत्र; ठरला पन्नशीतला सर्वात तरुण व्यक्ती

यासगळ्यात बॉलिवूडचा अभिनेता आणि प्रसिद्ध युट्युबर के आर के अर्थात कमाल राशिद खाननं नवाझुद्दीननं गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता नेटकऱ्यांना वेगळेच प्रश्न पडू लागले आहे. नवाझुद्दीन अरे तुझी मुलं रस्त्यावर आली आहेत आणि तू बंगल्यात कसा काय झोपतो, असा प्रश्न केआरकेनं नवाझुद्दीनला विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी नवाझुद्दीनच्या भावानं देखील त्याच्यावर मोठे आरोप केले होते. त्यात गेल्या काही वर्षांपासून नवाझुद्दीनच्या स्वभावात बराचसा बदल झाला असून तुम्ही त्याच्या साध्याशा चेहऱ्यावर काही जाऊ नका, त्यामागे एक भयानक व्यक्तिमत्व दडले आहे. असे त्यानं म्हटले होते. यासगळ्यात केआरके पुन्हा एकदा त्याच्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com