Nawazuddin Siddiqui Case: नवाझ आणि पत्नी आलियातील वाद शमला? न्यायालयासमोर या अटी- शर्ती मान्य

Bombay High- Court On Nawazuddin Siddiqui Case: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची विभक्त पत्नीसोबतच्या वादातील प्रकरणाची मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली.
Nawazuddin Siddiqui Case On Bombay High- Court
Nawazuddin Siddiqui Case On Bombay High- CourtSaam Tv

Bombay High-Court: बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी सध्या चित्रपटांमुळे नाही तर, त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच काळ चर्चेत आहे. नवाझुद्दीन आणि त्याची विभक्त पत्नी आलिया यांच्यातील वाद आता खासगी राहिला नसून सर्वश्रृत झाला आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची विभक्त पत्नीसोबतच्या वादातील प्रकरणाची मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कौटुंबिक वादावर सकारात्मक तोडगा निघाला असून दोन्ही बाजूंनी कोर्टाच्या मध्यस्थीनंतर काही अटी आणि शर्तींनुसार तोडगा निघाला आहे.

Nawazuddin Siddiqui Case On Bombay High- Court
Gautami Patil's Favourite Cricketer: लाखो दिलों की धडकन... गौतमी पाटीलचा आवडता क्रिकेटपटू कोण?

यावेळी नवाझुद्दीन सोबत पत्नी आलिया त्यांची १२ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षाच्या मुलासोबत कोर्टात पोहोचली. नवाझुद्दीन सिद्दीकी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाझुद्दीनने मुलांबद्दल सेटलमेंट ऑफर केली होती. अशा परिस्थितीत मुलांचे संगोपन आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी अभिनेत्यावर सोपवण्यात आली असून दोघांमध्ये करार झाला आहे.

आलियाने अलीकडेच नवाझुद्दीनला आयुष्यभर ‘गैरहजर वडील’ असा टॅग दिला होता. आलिया म्हणाली होती की, नवाजने आपल्या मुलांचे योग्य प्रकारे संगोपन केले नाही. इतकेच नाही तर आलियाने नवाजवर आरोपही केला होता की, तो माझ्यासोबत (आलिया) राहू इच्छित नाही. नुकतेच एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, जर नवाज आपल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि संगोपनाची जबाबदारी घेण्यास तयार असेल तर मी पाहिजेल ते करण्यासाठी तयार आहे.

Nawazuddin Siddiqui Case On Bombay High- Court
Ajit Bhagat Passes Away: चालते बोलते नाट्यविद्यापीठ हरपले; जेष्ठ रंगकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत काळाच्या पडद्याआड

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने पहिल्यांदा दोघांची खासगी पद्धतीने सुनावणी घेतल्यानंतर एकत्रितपणे सुनावणी घेतली. मुलांना भेटण्यासाठी कोणतेही बंधन किंवा अटी आणि शर्ती नाहीत.

मुलांचे शिक्षण दुबईला होणार, दोन्ही पक्ष यापुढे समाज माध्यम ट्विटरवर, व्हाट्सअपवर कोणतेही भाष्य करणार नाहीत. अशी देखील संमती झाली असल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याची विभक्त पत्नी झैनब सिद्दीकी हिला दोन्ही अल्पवयीन मुलांसह सोमवारी हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.

मुलांवरून होत असलेला वाद सर्वांच्या सामंजस्याने सुटावा यासाठी वकिलांनी त्यांना न्यायालयात हजर होण्यासाठी सांगितले. नवाझला आपले मुलं कुठे आहेत, याची माहिती नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. मुलांसोबत दुबईत राहत असलेल्या झैनबने दोन्ही मुलांना न कळवताच भारतात आणले असल्याचा आरोप नवाझने केला.

Nawazuddin Siddiqui Case On Bombay High- Court
Parveen Babi Journey: बॉलिवूडच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त परवीन बाबीचा जीवनप्रवास

नवाझने न्यायालयत सादर केलेल्या याचिकेत, मुलं सध्या कुठे आहेत याची मला अद्याप माहिती नसून त्यांची आणि माझी भेट व्हावी सोबतच, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, अशी मागणी त्याने न्यायालयात केली. नवाजुद्दीन सिद्दीकीने काही दिवसांपूर्वीच सांगितले, आमच्या वादामुळे मुलांचे नुकसान होत आहे. दोन्ही पक्षांमधील कायदेशीर हस्तक्षेप सुरूच राहणार असून न्यायालय जूनमध्ये नवाजुद्दीन आणि आलियाची पुन्हा सुनावणी करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com