Nawazuddin Siddiqui Haddi Film New Look: नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार; दिग्दर्शकांसह निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Nawazuddin Siddiqui Haddi Movie Look: ‘हड्डी’च्या निर्मात्यांनी नवाझुद्दिन सिद्दीकीचा नवा पोस्टर शेअर झाला आहे. मात्र, निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाबाबतीत महत्वाचा निर्णय घेतला.
Nawazuddin Siddiqui Haddi Movie Release On OTT
Nawazuddin Siddiqui Haddi Movie Release On OTTInstagram

Nawazuddin Siddiqui Haddi Movie Release On OTT: गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेला नवाझुद्दिन सिद्दीकी आता ‘हड्डी’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटामध्ये नवाझुद्दिन सिद्दीकीसोबत अवनीत कौर देखील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटानंतर लवकरच अभिनेत्याचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी अभिनेत्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. फार मोठ्या ब्रेकनंतर ‘हड्डी’ चित्रपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली नसून हा चित्रपट आता थिएटरमध्ये नाही तर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Nawazuddin Siddiqui Haddi Movie Release On OTT
Subhedar Trailer : राजं आधी लगीन कोंढाण्याचं... 'सुभेदार' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

नुकताच सोशल मीडियावर, चित्रपटाचा नवा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे, अशी घोषणा केली. नवाझुद्दिन सिद्दीकीचा हा आगामी चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्माते अनुराग कश्यप यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली आहे. चित्रपटाचा हा नवा पोस्टर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

दिग्दर्शकांनी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे. दिग्दर्शकांनी पोस्टर शेअर करताना, कॅप्शन दिले की, ‘चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहोत. ‘हड्डी’ लवकरच Zee 5 वर येत आहे.’

चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता फारच शिगेला पोहोचली. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, नवाझुद्दिन एका तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो एका खुर्चीवर बसलेला दिसून येत आहे.

आता पर्यंत अभिनेत्याचे त्या लूकमधील अनेक पोस्टर व्हायरल झालेले आहेत. त्या सर्वच लूकप्रमाणे या लूकने देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

Nawazuddin Siddiqui Haddi Movie Release On OTT
Krutika Dev In Taali Web Series: गौरी सावंतच्या बालपणाचे पात्र साकारणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; ट्रेलरमधून समोर आली झलक

‘हड्डी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली नसून चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee 5 वर प्रदर्शित होणार असल्याची माहिती जाहीर केली. चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्माने केलं आहे, तर झी स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक जेव्हा प्रदर्शित करण्यात आला तेव्हापासून हा चित्रपट २३ ऑगस्ट २०२३ ला प्रदर्शित होणार, अशी चर्चा सुरू होती. पण अद्याप अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com