Tiku Weds Sheru: कंगना रनौतच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी

मणिकर्णिका फिल्म्सच्या (Manikarnika) बॅनरखाली 'टीकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) चित्रपटाची घोषणा केली आहे.
Tiku Weds Sheru: कंगना रनौतच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी
Tiku Weds Sheru: कंगना रनौतच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकीSaam Tv

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये (Bollywood) आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आजकाल आपल्या चित्रपटासाठी खास चर्चेत आहे. कंगना रनौत आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर निर्माता म्हणून प्रवेश करणार आहे. होय, कंगना रनौतने तिच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सच्या (Manikarnika) बॅनरखाली 'टीकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. कंगना रनौतने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याची घोषणा केली आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचे कंगनाने केले स्वागत

याबाबत माहिती देताना कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा फोटो शेअर करताना कंगना लिहिले आहे 'टीममध्ये आपले स्वागत आहे सर'. कंगनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय मणिकर्णिका चित्रपटाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, 'पिढीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता टीकू वेड्स शेरूच्या टीममध्ये सामील झाला आहे. आम्हाला एक शेर सापडला आहे आणि आम्हाला तुमच्याविषयी अभिमान आहे'.

या प्रोजेक्टमध्ये दिसणार तारे

या चित्रपटाशिवाय कंगना 'थलावी', 'धाकड', 'तेजस' सारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये दिसणार आहे. तर आपण नवाझुद्दीन सिद्दीकीबद्दल बोललो तर तो लवकरच 'जोगीरा सा रा रा'मध्ये नेहा शर्मा सोबत दिसणार आहे. याशिवाय त्याचा 'बोले चुडिया' हा चित्रपटही लवकरच रिलीज होईल.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com