Nawazuddin Siddiqui's Movie Teaser: जुगाडी जोगी बनून प्रेक्षकांना हसवायला नवाज सज्ज; 'जोगीरा सा रा रा रा' टीझर प्रदर्शित

Jogira Sara Ra Ra Teaser Out: नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटाचा टीझर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Jogira Sara Ra Ra Teaser Out
Jogira Sara Ra Ra Teaser OutSaam TV

Nawazuddin Siddiqui's Jogira Sara Ra Ra Teaser Out: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या कौटुंबिक वादामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होता. तर दुसरीकडे त्याच्या 'हड्डी' चित्रपटातील लूकमुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. 'हड्डी'ची चर्चा होत असताना नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट फॅमिली कॉमेडी चित्रपट आहे. 'जोगीरा सा रा रा रा' असे चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीनसह नेहा शर्मा देखील दिसणार आहे. तर ईदच्या शुभ मुहूर्तावर नवजाने या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. टीझरमध्येच तुम्ही कॉमेडीचा तडका पाहू शकता.

Jogira Sara Ra Ra Teaser Out
Singam 3 Release Date Out: 'सिंघम 3' च्या रिलीज डेटची घोषणा! अजय देवगणसह दीपिकाही दिसणार पोलिसांच्या गणवेशात

नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटाचा टीझर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'तुम्हा सर्वांना ईदच्या शुभेच्छा. ट्विस्ट, रिस्क आणि जुगाड यांनी भरलेला कौटुंबिक विनोदी चित्रपट तुमच्यासमोर सादर करत आहे. आमचा आगामी चित्रपट #JogiraSaraRaRa चा अधिकृत टीझर आता प्रदर्शित झाला आहे.'

या चित्रपटात नवाज जुगाडू जोगी प्रतापच्या भूमिकेत दिसणार आहे. तर नेहा शर्मा त्याची गर्लफ्रेंड डिंपलच्या भूमिकेत दिसणार आहे. 'जोगीरा सा रा रा'चा टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नवाजचे चाहते कमेंट करून चित्रपटाबद्दलचे उत्सुकता व्यक्त करत आहेत.

नेटकरी या टीझरवर भरभरून कमेंट करत आहेत. एका नेटकाऱ्याने कमेंट करत लिहिले आहे, 'बॉलिवूडचे दिग्गज परत आले आहेत.' दुसऱ्याने लिहिले आहे, 'नवाज भाईचा अप्रतिम अभिनय.' त्याचवेळी आणखी एकाने लिहिले की, 'बॉलिवुडमध्ये काहीतरी नवीन येत आहे.'

'जोगीरा सा रा रा' हा चित्रपट १२ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केले आहे. या चित्रपटाची पटकथा गालिब असद भोपाली यांनी लिहिली आहे. चित्रपटात नेहा शर्मा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याशिवाय संजय मिश्रा आणि महाक्षय चक्रवर्ती देखील आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com