Upcoming Marathi Movie 2022: 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' मांजरेकरांचा भयानक सिनेमा

Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha: हा चित्रपच १८ वर्षांखालील प्रेक्षकांसाठी तर मुळीच नाही, पण कमजोर ह्रद्याच्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना सांभाळूनच रहावं लागेल असं या ट्रेलरवरुन वाटतं.
Upcoming Marathi Movie 2022: 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' मांजरेकरांचा भयानक सिनेमा
Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha Movie PosterTwitter/@manjrekarmahesh

आपल्या साहसी आणि आगळ्या - वेगळ्या तसेच वादग्रस्त विषयांवरील चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर पुन्हा एक खतरनाक विषयावर सिनेमा घेऊन येत आहेत. 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) असं या चित्रपटाचं नाव असून येत्या १४ जानेवारीला हा चित्रपट (Marathi Movie) सिनेमागृहात रिलीज होणार आहे. ८ जानेवारीलाच या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला होता आता तीन दिवसांनी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha Marathi movie releasing on 14 January)

पहा ट्रेलर -

या चित्रपटाचं नाव जेवढं अजब आहे तेवढंच खतरनाक या चित्रपटाचं ट्रेलर वाटतं. ट्रेलर पाहून माईंड डिस्टर्ब होणार हे नक्की, कारण साधेभोळे दिसणारे दोन शाळकरी मुलं यात चक्क मर्डर करणारे क्रुर किलर्स दाखवले आहेत. शिवाय यातील दिग्या (प्रेम धर्माधिकारी) हा मुख्य भुमिकेत असलेला शाळकरी मुलगा भयानक हत्या करताना दिसतो. रक्तपात, शिव्या, खून आणि स्वतःच्याच काकुशी सेक्स असं भयानक दृश्य या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय. काही हाल्प न्यूज आणि इंटीमेंट सीन्सदेखील या चित्रपटात असल्याची झलक ट्रेलरमधून दिसते. त्यामुळे हा चित्रपच १८ वर्षांखालील प्रेक्षकांसाठी तर मुळीच नाही, पण कमजोर ह्रद्याच्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना सांभाळूनच रहावं लागेल असं या ट्रेलरवरुन वाटतं.

या चित्रपटाची टॅगलाईनही तशीच आहे. "अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं" अशी टॅगलाईन देत दम असेल कर हा चित्रपट थिएटरमध्ये पहावा असं ओपन चॅलेंज निर्मात्यांनी दिलंय.

Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha Movie Poster
Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

चित्रपटाच्या टीमबाबत बोलायचं झालं तर हा चित्रपट अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या ‘एन एच स्टुडिओज’ या भारतातल्या अग्रगण्य निर्मिती संस्थेने निर्माण केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एन एच स्टुडिओज’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केली असून सहनिर्मिती ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’च्या विजय शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन जयंत पवार तर दिग्दर्शन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी केलं आहे. प्रेम धर्माधिकारी हा मुख्य भुमिकेत असून वरद नागवेकर, छाया कदम शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मीरा शहा, उमेश जगताप, गणेश, यादव अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर इत्यादी कलाकार या चित्रपटात झळकले आहेत

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.