'या' बालिश कारणामुळे अभिनेत्री नीना गुप्तांनी केले होते लग्न

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Actress Neena Gupta) आजकाल खूपच चर्चेत आहेत. त्याचे कारण त्यांचे चरित्र 'सच कहूं' आहे.
'या' बालिश कारणामुळे अभिनेत्री नीना गुप्तांनी केले होते लग्न
Actress Neena GuptaSaam Tv

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Actress Neena Gupta) आजकाल खूपच चर्चेत आहेत. त्याचे कारण त्यांचे चरित्र 'सच कहूं' आहे. या पुस्तकात नीना गुप्ता यांनी असे खुलासे केले आहेत की जे लोकांना आतापर्यंत माहिती नव्हते. पुस्तकात, नीनांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल देखील सांगितले आहे. जे फारच थोड्या काळासाठी चालले होते आणि ते अगदी बालिश कारणांसाठी केले गेले होते.

नीना गुप्ता यांनी पुस्तकात लिहिले आहे की, 'त्या इंटर कॉलेजच्या कार्यक्रमात अमलान कुमार घोष यांना भेटल्या होत्या. अमलान आयआयटी दिल्ली येथे शिक्षण घेत होते. दोघेही आपल्या हॅास्टेल्या आवारात किंवा घराच्या जवळ गुप्तपणे भेटत होते. अमलानचे आई-वडील दुसर्‍या शहरात राहत असत, पण त्याचे आजोबा निना यांच्या शेजारी राहत होते. यामुळे दोघांनाही भेटण्याची संधी मिळत असे.

Actress Neena Gupta
IND vs ENG: खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर; BCCI चा मोठा निर्णय

नीना पुढे म्हणाल्या की त्या आणि अमलान दोघांनीही बरेच सण आणि सुट्ट्या एकत्र घालवल्या होत्या. तसंच, पुस्तकात असे स्पष्टपणे सांगितले आहे की नीना यांना प्रियकर ठेवण्यास बंदी होती. परंतु अनुभव खूप रोमांचक होता. हे जोडपे गाडीने डेटवर जात असत त्याचबरोबर दोघांनी आयआयटी दिल्लीजवळ बराच वेळ घालवला.

या गोष्टिसाठी केले होते लग्न

त्यांच्या नात्याबाबत नीना पुढे म्हणाल्या, 'बर्‍याच दिवसांपासून त्यांच्या आई पासून या नाते लपून राहिल्यानंतर त्या गंभीर झाल्या होत्या. यानंतर त्यांनी आईला याबद्दल सांगितले कारण हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल गंभीर बनले होते. या नात्या बाबत नीनाची आई खूश नव्हती, तरीही दोघांनी लग्न केले. लग्न कसे घडले या संदर्भात अभिनेत्रीने लिहिले आहे- 'अमलान आणि त्याच्या मित्रांनी श्रीनगर ट्रिपचा प्लान केला. नीनालासुद्धा त्याच्यासोबत जाण्याची इच्छा होती, परंतु त्यांच्या आईने सांगितले की लग्नानंतरच ती अमलानबरोबर कुठेही जाऊ शकते.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com