नेहा धुपियाकडे पुन्हा पाळणा हलणार, दुसऱ्यांदा आई होणार
नेहा धुपियाकडे पुन्हा पाळणा हलणार, दुसऱ्यांदा आई होणारInstagram/nehadhupia

नेहा धुपियाकडे पुन्हा पाळणा हलणार, दुसऱ्यांदा आई होणार

फोटो शेअर करत दिली माहिती

मुंबई - बॉलिवूड आभिनेत्री Actress नेहा धुपिया Neha Dhupia आणि अंगद बेदीयांच्या Andad Bedi चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेहा धूपिया दुसऱ्यांदा आई होणार आहे. हे दोघे लवकरच आपल्या दुसर्‍या बाळाचे स्वागत करणार आहेत. सोशल मीडियावर Socail Media नेहाने एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात नेहा पती अंगद बेदी आणि मुलगी मेहरसोबत दिसून येत आहे. सध्या नेहाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

हे देखील पहा -

फोटो शेअर करत नेहाने एक कॅप्शन सुद्धा लिहिले आहे, या फोटोला काय कॅप्शन द्यायचे हा विचार करण्यात आमचे २ दिवस गेले आणि आम्ही विचार केलेले सर्वात उत्तम कॅप्शन म्हणजे देवा तुझे खूप आभार…’ या आशयाचे कॅप्शन नेहानेआपल्या फोटोला दिले आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत नेहाने दुसऱ्यांदा गरोदर असल्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये तिघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. नेहाने ३ वर्षांपूर्वी अंगद बेदीशी लग्न केले. नेहाने अंगदसोबत १० मे २०१८ रोजी दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये लग्न केले होते. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०१८ मुलगी मेहरचा जन्म झाला होता. आता नेहा पुन्हा गरोदर असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com