'पॉर्न बिझनेसमध्येही मोठा संघर्ष' म्हणत नेटकऱ्यांनी उडवली शिल्पाची खिल्ली!

रोज नवे धक्कादायक खुलासे राज कुंद्राला अटक झाल्यापासून समोर येत आहेत. तर दुसरीकडे आता शिल्पा शेट्टी सर्वांच्या निशाण्यावर आहे.
'पॉर्न बिझनेसमध्येही मोठा संघर्ष' म्हणत नेटकऱ्यांनी उडवली शिल्पाची खिल्ली!
'पॉर्न बिझनेसमध्येही मोठा संघर्ष' म्हणत नेटकऱ्यांनी उडवली शिल्पाची खिल्ली!Saam Tv

रोज नवे धक्कादायक खुलासे राज कुंद्राला Raj Kundra अटक झाल्यापासून समोर येत आहेत. तर दुसरीकडे आता शिल्पा शेट्टी सर्वांच्या निशाण्यावर आहे.

राज कुंद्राला अटक झाली आणि तेव्हापासून शिल्पा शेट्टीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण सुरु आहे. अलीकडेच शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिल्पा शेट्टी यामध्ये तिचा पती राज कुंद्राच्या खडतर दिवसांबद्दल लोकांना सांगत आहे. त्याच्या बालपणीच्या कष्टाबद्दल सांगत आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ एका मॅग्झिनच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या जुन्या व्हिडीओत राज कुंद्राच्या आई-वडिलांबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल ती बोलताना दिसून येत आहे.

हे देखील पहा-

ती या व्हिडीओ मध्ये सांगत आहे की, राज कुंद्राचे वडिल लंडनमध्ये London बस कंडक्टर होते. तर आईदेखाल एका फॅक्टरीत Factory काम करायची. असे शिल्पा या व्हिडीओत म्हणत आहे. त्यावेळी ती म्हणते राज कुंद्रा मध्ये पण त्यांच्या आईवडिलांचा संघर्ष आला आहे. राजच्या आई वडिलांना देखील मोठा संघर्ष करावा लागला होता. 6 महिन्यांचं बाळ सांभाळत ते नोकरी करायचे. असे शिल्पा त्या व्हिडिओत सांगत आहे.. राज कुंद्राला देखील मोठा संघर्ष करावा लागला आहे असे शिल्पा म्हणाली आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर काही नेटकरी या व्हिडीओच्या खाली कमेंट करत आहेत. शिल्पाला ट्रोल करत आहेत. “हो पॉर्न बिझनेसमध्येही खूप संघर्ष आहे.” अशी कमेंट करत काही लोकांनी शिल्पाची चांगलीच खिल्ली उडवने सुरु आहे. तर यावर एक नेटकरी म्हणातो की, आता “संघर्ष पुन्हा सुरु”

पॉर्नोग्राफी प्रकरणी (Pornography cases) व्यावसायिक राज कुंद्राच्या (Raj Kundra) न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याच बरोबर, रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज कुंद्राच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला आहे. मागील सुनावणी दरम्यान राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर आजच्या सुनावणीतही राज कुंद्राच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com