Double XL Teaser: 'डबल एक्सएल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; सोनाक्षी आणि हुमाचा हा नवा अंदाज,पाहा टीझर…

प्रेक्षकांना टीझरमध्ये शरीरयष्टी या गंभीर विषयावर मिश्किल आणि विनोदी शैलीने बोलणाऱ्या दोन मैत्रिणी 'डबल एक्सएल' चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल.
Double XL Teaser
Double XL TeaserSaam Tv

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) मध्ये बऱ्याच चित्रपटांची घोषणा होत आहे. त्यातच बरेचसे चित्रपट बॉयकॉट (Boycott Trend) केले जात आहेत. तर काही चित्रपट रॅकॉर्डब्रेक कमाई करीत आहेत. त्यातच आणखी एक भर म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या 'डबल एक्सएल' (Double XL) आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात वाढलेले वजन आणि बॉडी शेमिंग या गंभीर विषयावर सोनाक्षी आणि हुमा बोलताना दिसत आहेत. एकंदर चित्रपटातील दोघींच्याही लूकने आणि सोबतच संवादानेही प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे.

Double XL Teaser
Ira Khan : आमिर खानच्या लाडक्या लेकीला बॉयफ्रेंड केलं हटके प्रपोज; पाहा VIDEO

आपल्या शरीरयष्टी या गंभीर विषयावर मिश्किल आणि विनोदी शैलीने बोलणाऱ्या दोन मैत्रिणी 'डबल एक्सएल' चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल. दोघींच्याही हटक्या वेस्टर्न लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले. चित्रपटात सोनाक्षी आणि हुमासोबतच जहीर इकबाल आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेला कलाकार महत राघवेंद्र मुख्य भूमिकेत झळकत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सतराम रमणी असून भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपूल डी शाह, राजेश बहल, आश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज चित्रपटाचे निर्माते आहेत.

मुख्य भूमिकेत असलेला महत राघवेंद्र या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर हुमा आणि सोनाक्षी यांच्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता वाढली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी हुमाच्या काही चित्रपटांची आणि वेबसिरीजची चर्चा चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली. सोनाक्षीच्या चित्रपटांनाही प्रेक्षक चांगला प्रतिसाद मिळतो. आता ही मैत्रीची जगुलबंदी प्रेक्षकांच्या मनाच ठेवा घेईल का ? हे पाहण्यास गंमत येईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com