'हा' नवीन कॉमेडी शो येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; The Kapil Sharma Show चे काय होणार?

हिंदी सोनी वाहिनीवर एक नवीन कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Kapil Sharma
Kapil SharmaInstagram/@kapilsharma

हिंदी सोनी वाहिनीवर एक नवीन कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबद्दल वाहिनीने याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे आता प्रसिद्ध "The Kapil Sharma Show' बंद होणार की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे. जर, द कपिल शर्मा शो बंद होणार असेल तर शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी ठरू शकते.

सोनी टीव्हीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या आगामी नवीन कॉमेडी शोची एक झलक दिली आहे. त्यामुळे द कपिल शर्मा शो' या शोची जागा इंडियाज लाफ्टर चॅलेंज घेऊन कपिल शर्मा शो प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून कपिल शर्मा शो बंद होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. मात्र, शो बंद होणार की नाही याबाबत सध्या द कपिल शर्मा शोच्या टीमकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु, आता एक लाफ्टर शो सोनी टीव्हीवर येतोय हे स्पष्ट झाले आहे.

कपिल शर्मा शो येऊ शकतो ब्रेक के बाद;

नवीन शोमुळे कपिलचा हा सिझन जर संपणार आहे अशी चर्चा सध्या या ट्विटमुळे होतेय. ब्रेकनंतर कपिल पुन्हा एकदा नवीन सेट आणि नव्या उर्जेसह सोनी टीव्हीवर परत येऊ शकतो. वीकेंडला येणाऱ्या इतर रिअॅलिटी शो आणि या शोच्या तुलनेत कपिल शर्माचा हा सीझन यावेळी टीआरपी चार्टवर (TRP Chart) काही ठसा उमटवू शकला नाही. पण हा शो टीव्हीसोबतच ऑनलाइनवरही या शोला पाहण्यास पसंती दिली जाते. तर, बरेच लोक हा शो OTT वर देखील पाहतात.

कपिल शर्मा शोला हवा नवा टच;

कपिलचा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहे. आत्तापर्यंत मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या शोला हजेरी लावली आहे. मात्र, इतकी वर्षे सुरू असलेल्या या शोमध्ये आता अनेकवेळा तेच-तेच पाहुणे बोलावले जातात. ज्यांना लोकांनी बरेचदा पाहिले आहे. त्यामुळे आता ब्रेक घेणे आणि पुन्हा एकदा काही नाविन्य घेऊन पुन्हा येणे हा कपिल शर्मा शोसाठी नवीन ट्रेंड बनला आहे. या ब्रेकमुळे त्याला इतर प्रोजेक्ट्स करायलाही वेळ मिळू शकतो तसेच शोमध्ये नवीन बदल घडवून आणण्याचे कामही त्याच्या टीममार्फत केले जाऊ शकते.

सोनी वाहिनीचे ट्विट-

'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन';

'इंडियाज लाफ्टर चॅम्पियन' हा एक नवीन रिअॅलिटी शो असेल. अनेक वर्षांनंतर टीव्हीच्या दुनियेत कॉमेडी चॅम्पियन्स शोधणारा हा शो पुनरागमन करणार आहे. याच टॅलेंट रिअॅलिटी शोमधून आजच्या दिवसातील दिग्गज कॉमेडियन कपिल शर्मा, भारती सिंगसारखे प्रसिद्ध झाले आहेत. मात्र, कालांतराने गायन आणि नृत्याचे रिअॅलिटी शो कॉमेडीच्या तुलनेत निर्मात्यांना आणि प्रेक्षकांना अधिक आकर्षित करू लागले. आता अनेक वर्षांनी पुनरागमन करणारा हा शो टीआरपीवर कोणता धमाल दाखवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com