
झी मराठी नेहमीच वेगवेगळ्या आशयांच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या आशयांनी प्रेक्षकांमध्ये नेहमीच झी मराठी चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?' अशा आशयाचे पोस्टर झळकत होते.
या पोस्टरची सर्वत्र चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात बऱ्याच वेगवान घडामोडी सुरु आहे. त्यामुळे लोक अनेक तर्कवितर्क लावत होते. याच दरम्यान या बॅनरमागचं गुढ उलगडलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत लावलेल्या या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्या बॅनरवर 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता. हे विधान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे असून केसरी या वर्तमानपत्रात लिहिलेल्या अग्रलेखाची ही हेडलाईन होती. टिळकांचे अग्रलेख हाच 'केसरी'चा आत्मा असायचा. टिळकांनी 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?', अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता.
आता त्याचाच आधार घेत मुंबईत हे बॅनर झळकवण्यात आले होते. मुंबईच्या काही परिसरात 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' अशा आशयाचे होर्डिंग लागले होते. पण हे होर्डिंग्स नेमके कोणी लावले?, मुंबईत होर्डिंग्स लावण्यामागे काही हेतू आहे की काय? या आणि याहून अधिक प्रश्नांचे उत्तर अखेर मिळालेले आहेत. झी मराठीवरील 'लोकमान्य' मालिकेच्या जाहिरातीसाठी हे बॅनर लावण्यात आलेले आहे. या बॅनरने अख्ख्या मुंबईत चांगलीच चर्चा रंगली होती.
मुंबईत झी मराठीवरील या मालिकेच्या पोस्टरने सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. ही मालिका पुढच्या महिन्यात २१ डिसेंबरपासून झी मराठीवर बुधवार ते शनिवारी रात्री ९:३० वाजता प्रदर्शित होणार आहे. सदर मालिका प्रेक्षकांच्या पंसतीस उतरणार का ? हे आता पाहावे लागणार आहे.
Edit By: Chetan Bodke
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.