Bigg Boss Marathi 4: किरण मानेला मिळणार का बिग बॉसच्या घरात एन्ट्री? पाहा व्हिडिओ

किरण मानेला जरी घराच्या बाहेर जावे लागले असले तरी त्याला बिग बॉसने स्पेशल पॉवर दिली आहे. मिळालेल्या या स्पेशल पॉवरमुळे घरात नवा ट्विस्ट अनुभवता येणार आहे.
marathi actor kiran mane
marathi actor kiran manesaam tv

Bigg Boss Marathi 4 Latest Update: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना एकत्र राहून गेले ५० दिवस पूर्ण झाले आहे. जस जसे घरातील दिवस पुढे सरकत आहे,तस-तसा स्पर्धकांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खेळ पाहण्यासाठी एक वेगळीच मज्जा येत आहे. बिग बॉस प्रत्येक आठवड्याला स्पर्धकांना नवा टास्क देत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस घरातील स्पर्धकांमधील वाद अधिकच वाढत जात आहे. स्पर्धकांमध्ये जितका वाद होत असतो, तितकीच त्यांची धम्माल, मस्ती ही होत असते.

marathi actor kiran mane
Bigg Boss Marathi 4: किरण माने बिग बॉसच्या घरातून बाहेर, मांजरेकरांनी दिली विशेष पॉवर

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात दोन स्पर्धकांना बाहेर जावे लागले आहे. त्यातील पहिली स्पर्धक म्हणजे, यशश्री मसुरीकर. तिला संपूर्ण घरात टूकटूक राणी म्हणून संबोधले जाते. तर त्यानंतर किरण मानेला जरी घराच्या बाहेर जावे लागले असले तरी तो टास्कमध्ये भाग घेऊ शकणार आहे. किरण मानेंला बिग बॉसने स्पेशल पॉवर दिली असून मिळालेल्या या स्पेशल पॉवरमुळे घरात नवा ट्विस्ट अनुभवता येणार आहे.

marathi actor kiran mane
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: बबितावर आले संकट, जर्मनीमध्ये झाली मोठी दुखापत

नुकतेच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बॉसने दिलेल्या सिक्रेट रुममध्ये किरण बसून घरातील सदस्यांवर नजर ठेवताना दिसत आहे. त्याच्याविषयी इतर सदस्य कशा पद्धतीने बोलत आहेत हे तो पाहत आहे. बिग बॉसने घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. या ट्विस्टमुळे घरातील समीकरणे चांगलेच बदलणार आहेत.

शेअर केलेल्या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट अस्सल गावकीच्या भाषेत करीत आहेत. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात अनेक नवनवे ट्विस्ट अनुभवता येणार आहे. बिग बॉसच्या सदस्यांना किरण माने घराबाहेर पडला असल्याचे सांगण्यात आले असून किरणला घराबाहेर न काढता त्याला एका सिक्रेट रुममध्ये ठेवण्यात आलेय.

marathi actor kiran mane
Jason David Frank: सर्वांच्या लाडक्या 'पॉवर रेंजर' फेम अभिनेत्यानं संपवलं जीवन, वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सध्या सिक्रेट रुममधून किरण आपल्याविषयी कोणता सदस्य काय बोलतोय? कोण त्याचा गेम करणार आहे हे तो पाहात आहे. यामुळे तो खेळातून जरी बाहेर पडला नसला तरी, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला नाही हे दिसून येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com