Nidhi Bhanushali
Nidhi BhanushaliInstagram/@_ninosaur

तारक मेहता'च्या जुन्या सोनूचा बोल्ड अवतार; समुद्रकिनारी दिल्या किलर पोझ

ज्या छोटू सोनूला लहानपणी क्यूट म्हणले जायचे, तीच छोटू सोनू आता खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

तारक मेहता का उल्टा चष्मामधील प्रत्येक पात्र लोकांचे मनोरंजन करण्यासाठी खूप प्रयत्न करते. छोट्या पडद्यावर दीर्घकाळ चालणाऱ्या या शोमध्ये लोकांना काही पात्रांनी खूप हसवलं आहे. पण या पात्रांचे चेहरे अनेक वेळा बदलले आहेत. असाच एक चेहरा निधी भानुशालीचा आहे जो छोट्या सोनूच्या भूमिकेत दिसायचा. एकेकाळी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या जुन्या सोनूला म्हणजेच निधी भानुशालीला (Nidhi Bhanushali) सोशल मीडिया क्वीन म्हंटले जाते. सध्या निधी भानुशालीच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. निधीचा हा अवतार आश्चर्य चकित करणारा आहे. नुकतेच या अभिनेत्रीने तिचे असे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे इंटरनेटचा पारा चढला आहे.

Nidhi Bhanushali
मासिक पाळीमुळेच नाही, तर 'या' कारणांमुळे महिलांमध्ये होऊ शकते पोटदुखी...

ज्या छोटू सोनूला लहानपणी गोंडस म्हणले जायचे ती छोटू सोनू आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. अलीकडेच निधी भानुशालीने तिच्या व्हेकेशन पिक्चर्सने (Nidhi Bhanushali Vacation Pictures) इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे. अभिनेत्रीची ही स्टाईल पाहून लोक वेडे झाले आहेत. या फोटोंमध्ये सोनू म्हणजेच निधी भानुशाली पांढऱ्या रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे. तसेच काळ्या डेनिम शॉर्ट्समधला तिचा लूक पाहण्यासारखा आहे. निधीचे चाहते तिचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त शेअर होताना दिसत आहेत. यासोबतच तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट करून निधीचे खूप कौतुक करत आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना निधीने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले आहे की - उन्हाळ्यासाठी तयार...

तारक मेहता के उल्टा चष्मामध्ये निधीने सोनूची भूमिका 6 वर्षे केली. पण अभ्यासाच्या कारणामुळे तिला तो शो सोडावा लागला होता. निधी भानुशालीने शो सोडल्यानंतर पलक सिधवानीने सोनूची भूमिका साकारली होती. निधी भानुशाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे जवळपास 1 मिलियन फॉलोअर्स देखील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com