नुसरत भरुचाला कंडोम विकणे पडले महागात! ट्रोल झाल्यावर म्हणाली…

नुसरत भरुचाचा 'जनहित मैं जारी' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात ती सेल्स गर्ल बनली आहे जी कंडोम विकत असते. या टीझरमुळे सध्या नुसरत सध्या ट्रोल होत आहे.
नुसरत भरुचाला कंडोम विकणे पडले महागात!  ट्रोल झाल्यावर म्हणाली…
Janhit Mein Jariसाम डिजिटल

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा ही एक अशी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते जिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये यश मिळवले आहे. सध्या नुसरत तिच्या 'जनहित में जारी' (Janhit Mein Jari) चित्रपटामुळे चर्चेत आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. नुकतेच नुसरतच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'जनहित में जारी' या चित्रपटाचे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले. त्यानंतर आता या चित्रपटाचा ( Janhit Mein Jari Teaser) टीझर समोर आला आहे. नुसरत चित्रपटात कंडोमचे प्रमोशन करताना दिसत आहे. काही प्रेक्षकांना चित्रपटाचा टीझर आवडला आहे. दुसरीकडे, अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.

टीझरमध्ये दिसून येत असल्याप्रमाणे, या चित्रपटात नुसरत भरुचा एका सेल्स गर्लच्या भूमिकेत आहे, जी कंडोम विकून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करते. परंतु, या कामामुळे नुसरत सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. चित्रपटाचा टीझर समोर येताच लोक तिला ट्रोल करत आहेत.

यानंतर नुसरतने काही वेळापूर्वी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये नुसरतने तिच्या पोस्टवर लोकांच्या कमेंट्सही दाखवल्या आहेत. यासोबतच तिने लोकांची घाणेरडी मानसिकताही दाखवून दिली असून केवळ हीच विचारसरणी बदलायची आहे, असे ती म्हणाली आहे. तीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नुसरतच्या पोस्टवर लोकांच्या अश्लील कमेंट्स दाखवल्या आहेत. यासोबतच काहीजण चित्रपटाला डी ग्रेड असल्याचे सांगत आहेत तर काहीजण बॉलिवूड हे मेडिकल स्टोअर झालय असेही कमेंट करत आहेत. नुसरतने, ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत, जन हितासाठी सर्वात वाईट आणि अश्लील टिप्पण्यांचे स्क्रीनशॉट जारी केले.

नुसरत भरुचाचे ट्विट;

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.