
First Women's To Work In Bollywood: आज जागतिक महिला दिन आहे. स्त्री शक्तीला साजरे करण्याचा दिवस. या आधुनिक जगात स्त्रिया सर्वच क्षेत्रात पाहायला मिळतात. पण काही वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. स्त्रियांना पावलो-पावली विरोध केला जायचा. अशा स्थितीतही अनेक स्त्रियांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्याकडे जगाशी लढण्याचे वेगळे सामर्थ्य होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
बॉलिवूडमध्ये देखील महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सुरुवातीला पुरुषच महिलांचे पात्र साकारायचे. जसं जसं महिल्यांनी त्यांचे अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली गोष्टी बदलत गेल्या. आज जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया बॉलिवूडमधील अशाच महिलांविषयी ज्यांनी नव्या पिढीला दिली नवी दिशा.
देविका रानी- पहिली लेडी
देविका रानी चित्रपट सृष्टीतील खूप मोठी नावे आहे . इंडस्ट्रीमध्ये सर्वात आधी अनेक नवनवीन गोष्टी करण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्यांना इंडस्ट्रीमधील पहिली महिला म्हणजे फर्स्ट लेडी म्हटले जाते. त्याशिवाय स्क्रिनवर किसिंग सीन देणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. देविका रानी दादा साहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली अभिनेत्री होती. त्यांनी ३०-४० दशकात काम केले आणि सन्मान प्राप्त केला.
सरस्वती देवी- पहिल्या म्यूजिक डायरेक्टर
तुम्ही अनेक यशस्वी पुरुष संगीतकारांचे नाव ऐकले असेल. परंतु तुम्ही कधी महिला संगीतकाराचे नाव ऐकले आहे का? ऐकले असेल तर खूप कमी वेळा. सरस्वति देवी बॉलिवूडमधील पहिल्या म्यूजिक कंपोजर होत्या. त्या हे काम खूप वर्षांपूर्वी केले आहे. त्यांनी ९० वर्षांपूर्वी संगीतकार म्हणून काम केले आहे. त्यांची त्यांच्या करियरमध्ये १९३५ ते १९४९ पर्यंत काम केले. जवळपास २० चित्रपटांना त्यांनी संगीत दिले.
सरोज मोहिनी नय्यर- पहिल्या महिला गीतकार
इंडस्ट्रीमध्ये खूप कमी महिला गीतकार आहेत. त्यातील सर्वात पहिले नाव म्हणजे सरोज मोहिनी नय्यर. त्या प्रसिद्ध म्यूजिक डायरेक्टर ओ पी नैयर यांच्या पत्नी होत्या. मिस्टर अँड मिसेस 55 चित्रपटामध्ये त्यांनी गीत लिहिले होते, त्या गाण्याचे नाव ‘प्रीतम आन मिलो’ असे होते. हे गाणे गीता दत्त यांनी गायले होते. नंतर गुलजार यांनी त्यांच्या अंगूर या चित्रपटामध्ये या गाण्याचा समावेश केला होता. हे गाणे देवेन वर्मा यांच्यावर चित्रित झाले होते.
सरोज खान- पहिल्या कोरियोग्राफर
गाणी आणि डान्स हे ओघाने येतातच. चित्रपटांमध्ये गाणी होती तर डान्स देखील होता. स्वतःच्या टॅलेंट अनेक कलाकारांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या सरोज खान या चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कोरियोग्राफर होत्या. रिपोर्ट्सनुसार सरोज खान यांनी त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये 3000 पेक्षा जास्त गाणी कोरियोग्राफ केली आहेत आणि अनेक स्टार्सचे करियर घडविले आहे. सरोज यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील अनेक मोठमोठ्या कलाकारांनी दुःख व्यक्त केले होते. त्या एक अश्या कोरियोग्राफर आहेत ज्यांनी कपूर कुटुंबातील तीन पिढ्यांना डान्स शिकवले आहे.
टुनटुन- पहिल्या कॉमेडियन
एका काळ असा होता की जेव्हा महिलांना चित्रपटामध्ये काम करणे शक्यच नव्हते. महिलांना चित्रपटामध्ये पाहताच लोक संतापायाचे. त्यामुळे महिला या सर्वापासून लांबच राहायच्या. अशा काळात टुनटुन यांनी चित्रपटामध्ये काम केले तसेच लोकांचे भरपूर मनोरंजन देखील केले. आजही त्यांचे योगदान सर्वांच्या स्मरणात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.