
Anupam Kher's Net Worth: बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे अनुपम खेर. आज अनुपम खेर यांचा ६८ वा वाढदिवस आहे. गेल्या वाशी प्रदर्शित झालेला चित्रपट 'द कश्मीर फाईल्स' मधील अभिनयामुळे अनुपम खेर चर्चेत आले.
अनुपम खेर त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासह बेधडक वक्तव्यासाठी देखील ओळखले जातात. अनुपम यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनुपम यांनी इथपर्यंत पोहचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. आता अनुपम एक लक्झरी लाईफ जगत आहेत. अनेक अडचणी पार केल्यानंतर यशस्वी झालेल्या या कलाकाराची संपत्ती किती आहे चला जाणून घेऊया.
अनुपम खेर चित्रपटामध्ये काम करण्यासाठी चांगलेच मानधन घेतात. प्रत्येक चित्रपटासाठी अनुपम करोडो रुपये घेतात. अनुपम खेर अनेक ब्रँडच्या जाहिरातीत देखील दिसतात. या जाहिरातीतून त्यांना मोठी रक्कम मिळते. रिपोर्ट्सनुसार, अनुपम खेर यांची एकूण संपत्ती 450 कोटी रुपये आहे. अनुपम खेर यांचे मुंबईत दोन बंगले आहेत. एक बंगला अंधेरी येथे आहे, तर दुसरा बंगला जुहू येथे आहे. या दोन्ही बंगल्याची किंमत ५ कोटींहून अधिक आहे.
अनुपम फक्त अभिनेते नाहीत, तर ते निर्माते, दिग्दर्शकही आहे. यासोबतच अनुपम खेर यांचे अनेक व्यवसाय आहेत ज्यातून त्यांना उत्पन्न मिळते. अनुपम यांचे कार कलेक्शनही भन्नाट आहे. अनुपम खेर यांच्याकडे BMW, Scorpio सारख्या अनेक कार आहेत. रिपोर्ट्सनुसार, अनुपम एका चित्रपटासाठी सुमारे 3 ते 5 कोटी रुपये मानधन घेतात आणि वर्षाला 30 कोटींहून अधिक कमावतात.
रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही वर्षांत त्यांची कमाई 30 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अनेक ब्रँड जाहिराती आणि वैयक्तिक गुंतवणूकीतून अनुपम कमाई करतात. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी अनुपम खेरच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने 250 कोटींहून अधिक कमाई केली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.