Aamir Khan : 'हर घर तिरंगा' मोहिमेत बॉलिवूडचा मोठा सहभाग, आमिर खाननं घरावर फडकावला तिरंगा

'लाल सिंग चड्ढा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमिरनं 'हर घर तिरंगा' या मोहिमेत सहभाग घेतला आहे. सोशल मीडियावर आमिर खानचे काही फोटो व्हायरल होत आहे.
Aamir Khan
Aamir Khan Saam Tv

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान(Aamir Khan) हा 'लाल सिंग चड्ढा'(laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे जबरदस्त चर्चेत आहे. चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपटातील त्याच्या भूमिकेने चाहत्याचं लक्ष वेधले आहे. आमिर खान तब्बल चार वर्षांनी या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमिरनं 'हर घर तिरंगा' या मोहिमेत सहभाग घेतला आहे. सोशल मीडियावर आमिर खानचे काही फोटो व्हायरल होत आहे.

Aamir Khan
Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत पुन्हा आली मोठी अपडेट, कुटुंबीय म्हणाले...

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याचदरम्यान बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने 'हर घर तिरंगा' या मोहिमेत भाग घेतला आहे. त्याने मुंबईतील घरावर तिरंगा फडकावला आहे. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Aamir Khan
Marathi Films : हिंदी चित्रपटांमुळं आमचा बळी जातोय; अभिनेता सुमीत राघवन का संतापला?

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घरी तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता आमिर खानने मुलगी इरा खानसोबत घराच्या बाल्कनीत राष्ट्रध्वज फडकावला आहे.

माहितीनुसार, आमिर खान ७५ वा स्वातंत्र्य दिन आसाममध्ये साजरा करणार होता. पण त्याचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत आसाममधील मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झाली होती.

गुरूवारी आमिरचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून चार वर्षांनंतर त्याने रूपेरी पडद्यावर पुनरागमन केलं आहे. १९९४ मध्ये सुपरहिट ठरलेला हॉलिवूड सिनेमा फॅारेस्ट गम या चित्रपटाचा हा रिमेक आहे. दरम्यान लाल सिंग चड्ढा या चित्रपटावरून आमिर आणि इतरांविरोधात भारतीय सैन्याचा अवमान आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत, याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com