
मुंबई : अभिनेता 'कार्तिक आर्यन' (Kartik Aaryan) सध्या एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कार्तिकच्या 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्याचा आगामी सिनेमा 'शेहजादा'चे चित्रीकरण देखील पूर्ण झालं आहे. त्यातच कार्तिक आर्यनने एक धक्कादायक बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. कार्तिक आर्यनने त्याचा एक फोटो शेअर करत धक्कादायक बातमीचा खुलासा केला आहे.
कार्तिक आर्यनने इंस्टाग्राम अकाउंटवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तो हात जोडून उभा आहे आणि त्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'सगळ काही एवढं पॉजिटिव चालू होतं, की कोविडला (corona) राहवलं नाही' त्याने या सोबतच एक इमोजी देखील पोस्ट केला आहे. या पोस्ट वरून हे स्पष्ट होते की कार्तिक आर्यनला कॉविड झाला आहे. त्यामुळे त्याच्या पुढच्या चित्रपटच्या चित्रीकरणावरून अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. कार्तिकला यापूर्वी २२ मार्च २०२१ मध्ये कोरोनाचे संक्रमण झाले होते. तेव्हा देखील त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून या संदर्भात माहिती दिली होती. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, 'मी पॉजिटिव्ह आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा'.काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया २' हा चित्रपट बॉक्सऑफिसवर खूप गाजतो आहे. या चित्रपटात कार्तिकने केलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही होतं आहे.
'भूल भुलैया २' या चित्रपटाने तब्बल २ आठवड्यांमध्येच १३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन सोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) व तब्बू (Tabu), मुख्य भूमिकेत आहेत. कार्तिक आर्यनने या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी कोणतीही कमतरता ठेवली नाही. तो मुंबई, पुणे, कोलकत्ता अशा अनेक ठिकाणी प्रोमोशनसाठी गेला होता. सोशल मीडीयावर देखील कार्तिक आर्यन या चित्रपटाशी संबंधित काही ना काही पोस्ट सतत टाकतचं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.