
Deepika Padukone At Oscar 2023: ऑस्कर २०२३ भारतासाठी फारंच खास होता. भारताला यावर्षी ऑस्करमध्ये एकूण दोन पुरस्कार मिळाले असून महत्वाची बाब म्हणजे दीपिकाने ऑस्कर २०२३मध्ये प्रस्तुतकर्ती (Presentor)ची भूमिका निभावली होती. आनंद महिंद्रांनी गाण्यासोबतच दीपिकाचंही कौतुक केलं होतं. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या कामावरुन ट्रोल करणाऱ्या कंगनानेही दीपिकाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केले. सध्या कंगनाने दीपिकाच्या केलेल्या कौतुकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
कंगना राणौतने अभिनेत्री दीपिका पदुकोणचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. दीपिकाचा एक व्हिडिओ शेअर करत कंगनाने ट्विट केले आहे की, "दीपिका पदुकोण इतकी सुंदर दिसते आहे, संपूर्ण देशासोबत एकाच वेळी एकत्र येत उभं रहाणं साधी गोष्ट नाही, तुमची प्रतिमा, प्रतिष्ठा त्या नाजूक खांद्यावर घेऊन उभी राहणे सोपे नाही. परदेशात एक भारतीय अभिनेत्री प्रेझेंटेटर म्हणून उभी राहणे फार महत्वाचं आहे. भारतीय महिला ठरवलं तर जग गाजवू शकतात या गोष्टीचं दीपिका पदुकोण जिवंत उदाहरण आहे."
दीपिका पदुकोणने एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर आरआरआर चित्रपटाबद्दल आणि त्यातील 'नाटू नाटू' या गाण्याविषयी प्रेक्षकांना आपल्या खास अंदाजात माहिती दिली. परदेशी कलाकारांनी 'नाटू नाटू' या गाण्यावर लाईव्ह परफॉर्म करत प्रेक्षकांकडून कार्यक्रमात स्टँडिंग ओव्हेशनही मिळालं होतं.
RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला असून एमएम कीरावानी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले. चंद्रबोस यांनी गाणे लिहिले असून राहुल सिपलीगुंज-कालभैरव जोडीने गायले आहे. RRR चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी गाण्याला उत्तम प्रतिसाद दिला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.