Oscar Awards 2023: यंदाचं ऑस्कर होणार खास, रेड कार्पेट नाही तर...

गेल्या 62 वर्षांपासून सुरू असलेल्या ऑस्करच्या कार्पेटबाबत यावेळी एक महत्वाचा बदल पाहायला मिळणार आहे.
Oscar Awards 2023
Oscar Awards 2023Saam Tv

Oscar Awards 2023 Carpet News: गेल्या अनेक दिवसांपासून हॉलिवूडमध्ये नाही तर बॉलिवूडमध्येही ऑस्करची चर्चा आहे. सिनेसृष्टीतील पुरस्कारसोहळा म्हटलं तर रेड कार्पेट येतंच. सिनेसृष्टीत रेड कार्पेटला अनन्य साधारण महत्व आहे. 95 व्या ऑस्कर पुरस्काराबाबत चर्चा सुरू असून यावेळी अनेक बातम्या समोर येत असून यावेळी बरेच बदल पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 62 वर्षांपासून सुरू असलेल्या ऑस्करच्या कार्पेटबाबत यावेळी एक महत्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. यावेळी रेड कार्पेट नसून अन्य रंगाचा कार्पेट असणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Oscar Awards 2023
अमृता समोर झाली कुशल बद्रिकेची फजिती, चंद्राची हूक स्टेप करताना स्टेजवरून खाली कोसळला

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची जगभरातील सर्वच सेलिब्रिटींना बरीच ओढ आहे. सोबतच पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटला बरंच अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक सेलिब्रिटी कसं आपण प्रत्येकापेक्षा वेगळं दिसू याकडे सर्वाधिक भर देतात. प्रत्येकाची या शोमध्ये हटके फॅशन पाहायला मिळते. यंदाच्या ऑस्करला रेड कार्पेट नसून दुसरा कलर असल्यानं जगभरातील अनेक सेलिब्रिटी नाराज झाल्याची चर्चा होत आहे.

Oscar Awards 2023
Priyanka Chopra Controversy: प्रियंकानं 'या' कारणामुळे तीन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न, खुद्द मॅनेजरनेच केला खुलासा

ऑस्करच्या कार्पेटचा इतिहास

1961 पासून ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून कार्पेटचा रंग लाल होता. पण २०२३ चा अर्थात या वर्षापासून ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील कार्पेटचा रंग बदलण्यात आला आहे. 1961 पासून म्हणजेच 33 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापासून दरवर्षी रेड कार्पेट अंथरले जाते. पण आता 62 वर्षांनी कार्पेटच्या रंगात बदल होणार आहे. ऑस्करचे नियोजन करणाऱ्या अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्सने यावेळी लाल रंगाऐवजी पांढरा रंग (White Color) निवडला आहे.

यावेळी कार्पेटचा रंग शॅम्पेन सारखा असेल, जो खूपच वेगळा दिसत आहे. तो दिसायला काहीसा पांढरा दिसतो. या अगोदर या अवॉर्ड शोमध्ये अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आला आहे. कधी अवॉर्डच्या डिझाईनमध्ये तर परफॉर्मन्स मध्येही बदल करण्यात आले होते. पण कार्पेट बदलणे ही एक वेगळीच गोष्ट असल्याने सध्या सर्वत्र याची चर्चा होत आहे.

'ऑस्कर 2023' भारतासाठी खूपच महत्वाचा आहे. एस.एस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे. त्यामुळे आता 'ऑस्कर 2023' कडे जगभरातील सिनेप्रेमींसह भारतीय सिनेप्रेमींचंदेखील उद्या होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याकडे लक्ष लागलं आहे. येत्या 12 मार्चला लॉस एंजेलिस येथे डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून भारतीयांना 13 मार्चला पहाटे 5.30 वाजता पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com