''...अन्यथा न्याय, माणुसकी, विवेक विसरुन जा!'' - जावेद अख्तर

तालिबानचं समर्थन करणाऱ्या तथाकथित शांतीप्रिय आणि लोकशाहीवादी देशांनी तालिबानला मान्यता द्यायला स्पष्ट नकार द्यायला हवा असं आवाहन जावेद अख्तर यांनी केलं आहे.
''...अन्यथा न्याय, माणुसकी, विवेक विसरुन जा!'' - जावेद अख्तर
''...अन्यथा न्याय, माणुसकी, विवेक विसरुन जा!'' - जावेद अख्तरSaam Tv News

''...अन्यथा न्याय, माणुसकी, विवेक विसरुन जा!'' - जावेद अख्तर

बॉलिवुडमधील प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन करणाऱ्यांना पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. तालिबानचं समर्थन करणाऱ्या तथाकथित शांतीप्रिय आणि लोकशाहीवादी देशांनी तालिबानला मान्यता द्यायला स्पष्ट नकार द्यायला हवा असं आवाहन जावेद अख्तर यांनी केलं आहे. ("... otherwise forget justice, humanity, conscience!" - Javed Akhtar)

हे देखील पहा -

महिलांवरील अन्यायाविरोधात तालिबानला स्पष्ट नकार द्यायला हवा, तालिबानचे समर्थन करु नये असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे प्रत्येक सभ्य व्यक्ती, लोकशाही राष्ट्र यांनी तालिबनला मान्यता द्यायला नकार द्यायला हवा. अफगाणिस्तानाल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तालिबानची सर्वच देशांनी निंदा करायला हवी''...अन्यथा न्याय, माणुसकी, विवेक विसरुन जा!'' असं आवाहन जावेद अख्तर यांनी ट्विटरद्वारे केलं आहे. त्याचप्रमाणे तालिबानी प्रवक्ता सय्यद झकीरुल्लाह यांनी ''महिला मंत्री बनण्याच्या लायकीच्या नाहीत, फक्त मुलं जन्माला घालण्याच्या लायकीच्या आहेत'' असं संतापजनक वक्तव्य केलं होत. त्या वक्तव्याचाही अख्तर यांनी समाचार घेतला आहे.

''...अन्यथा न्याय, माणुसकी, विवेक विसरुन जा!'' - जावेद अख्तर
टॉलिवूड अभिनेता साई धरम तेजचा अपघात; प्रकृत्ती स्थिर

जावेद अख्तर आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वीच त्यांनी राष्ट्रीय सेवा संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यामुळे आरएसएस, भाजप आणि शिवसेनेसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी जावेद अख्तरांच्या वक्तव्याचा निषेध केला होता, मात्र जावेद अख्तर आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com