
मनोरंजन जगतात अनेक बदल झाले आहेत. चित्रपट, मालिकांपेक्षा आता तरुण वर्ग ओटीटीवर जास्त रमत असल्याचे दिसते. दर आठवड्याला ओटीटीवर नवनवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. या आठवड्यात ओटीटीवर कोणत्या नवीव वेबसीरीज आल्या आहेत, चला जाणून घेऊयात.
‘कोहरा’
‘कोहरा’ ही वेबसीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या वेबसीरीजमध्ये पंजामधील कथा दाखविण्यात आली आहे. पेज थ्री कपलच्या मुलाच्या खुनावर ही कथा आधारित आहे. पोलीस या केसचा कसा तपास करतात हे पाहणं या वेबसीरीजमध्ये इंटरेस्टिंग आहे.
'लव्ह अॅट फर्स्ट साईट'
जर तुम्हाला रोमॅंटिक काही पाहायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. पहिल्या नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या प्रेमी युगुलांची कथा तुम्हाला एक सुंदर मेसेज देखील देते.
'सायलेन्स'
जुन्या चित्रपटांपैकी मनोज वायपेयींचा एक कमाल चित्रपट 'सायलेन्स' झी ५ वर उपलब्ध आहे. पोलीस इन्स्पेक्टर मनोज वायपेयी न्यायाधीशांच्या मुलीच्या खुनाची केस कशी सोडवतात हे या चित्रपटामध्ये दाखविण्यात आली आहे.
'सेक्स एज्युकेशन'
नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध वेबसीरीज सेक्स एज्युकेशनचा नवीन सीजन प्रदर्शित होणार आहे. २१ सप्टेंबराला हा नवीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जर तुम्ही ही सीरीज पहिली नसेल तर या सीरीजचे तीन भाग उपलब्ध आहेत. यातून तुमच्या ज्ञानात नक्की भर पडेल. (Latest Entertainment News)
'बम्बई मेरी जान'
अमेझॉन प्राईमवर 'बम्बई मेरी जान' ही सीरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या जीवनावर ही कथा आधारित आहे. या सीरीजचे दिग्दर्शन शूजात सौदागर यांनी केले आहे. या सीरीजची कथा सुप्रसिद्ध क्राइम लेखक एस हुसैन जैदी यांनी लिहिली आहे.
'काला'
डिस्ने प्लस होटस्टारवर नुकतीच 'काला' ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. ४ भागांच्या या सीरीजमध्ये तुम्हाला क्राईम, ड्रामा आणि अॅक्शन पाहायला मिळणार आहे. थ्रिल्लिंग पाहायचं असेल तर तुम्ही ही वेबसीरीज पाहू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.