Joyland Movie: प्रदर्शनापुर्वीच पाकिस्तानी सिनेमा ऑस्करमध्ये, तरीही चित्रपटावर बंदी; वाचा सविस्तर कारण

पाकिस्तानमधून ऑस्करसाठी 'जॉयलंड' चित्रपटाला अधिकृत एन्ट्री मिळाली होती.
Joyland Movie
Joyland MovieSaam Tv

Pakistan Bans Joyland: पाकिस्तानात 'जॉयलंड' चित्रपटाची बरीच चर्चा होत आहे. पाकिस्तानमधून ऑस्करसाठी या चित्रपटाला अधिकृत एन्ट्री देखील मिळाली होती. परंतु पाकिस्तानानेच या चित्रपटावर बंदी घातली आहे. 'जॉयलँड ' १८ नोव्हेंबरला जगभर प्रदर्शित होणार होता. पण पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटावर बंदी घातली आहे.

सईम सादिक यांनी 'जॉयलँड' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ४ नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. मात्र प्रदर्शनापूर्वीच पाकिस्तानने या चित्रपटावर बंदी घातली आहे. हा चित्रपट पाकिस्तानमधील अशा प्रकारचा पहिला चित्रपट आहे जो ऑस्करसाठी पाठवला जात आहे. ऑस्करपूर्वी 'जॉयलँड' कान फिल्म फेस्टिव्हलसह इतर अनेक परदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे समीक्षकांनी सुध्दा कौतुक केले आहे. (Movie)

Joyland Movie
Fatima Sana Shaikh: 'दंगल गर्ल' फातिमा शेखला आहे 'हा' गंभीर आजार, सोशल मीडियावर करतेय या आजाराविषयी जनजागृती

चित्रपटावर बंदी घालताना पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'अत्यंत आक्षेपार्ह गोष्टी'मुळे चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी मंत्रालयाने या चित्रपटाला प्रमाणपत्र दिले होते. तसेच आता अचानक हे पाऊल उचलल्याने चित्रपटातील कलाकारही संभ्रमात पडले आहेत.

'जॉयलँड'च्या बोल्ड कंटेंटला पाकिस्तानमध्ये विरोध करण्यात आला होता. त्यानंतर मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, "चित्रपटात अत्यंत आक्षेपार्ह कन्टेंट असल्याच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, जो आपल्या समाजातील मूल्ये आणि मान्यतांनुसार नाही." (Pakistan)

Joyland Movie Cast
Joyland Movie CastSaam Tv

'जॉयलँड'मध्ये सानिया सईद, सरवत गिलानी, रस्ती फारूख, अली जुनेजो, अलिना खान, सलमान पिरजादा आणि सोहेल समीर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या निर्णयावर टीका करताना चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री सरवत गिलानी हिने ट्विट केले की, "6 वर्षात २०० पाकिस्तानी लोकांनी एकत्र चित्रपट बनवला ही लाजिरवाणी गोष्ट आहे, त्या चित्रपटाचे टोरंटोपासून ते कैरोपर्यंत आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत कौतुक झाले आहे. आता त्याला आमच्यात देशात बंदी घालण्यात येत आहे. देशाचा हा अभिमानाचा क्षण आमच्यापासून हिरावून घेऊ नका." (Film Festival)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com