Pakistani Actress Slams Kangana Ranaut: ‘कंगनाच्या कानाखाली मारायची आहे’; पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा

Nausheen Shah And Kangana Ranaut News: एका पाकिस्तानी अभिनेत्रीने मुलाखतीच्या माध्यमातून कंगनाला भेटून तिच्या कानाखाली मारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Pakistani Actress Wants To Slap Kangana Ranaut
Pakistani Actress Wants To Slap Kangana RanautSaam Tv

Pakistani Actress Wants To Slap Kangana Ranaut

बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रनौत कायमच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिली आहे. कंगनाचा येत्या १९ सप्टेंबरला ‘चंद्रमुखी २’ प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच अभिनेत्रीचा लूक कमालीचा चर्चेत राहिला आहे. तिच्या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओत अभिनेत्रीने कंगनाला भेटून तिच्या कानाखाली मारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Pakistani Actress Wants To Slap Kangana Ranaut
Asha Bhosale Birthday: पहिला नवरा १५ वर्षांनी मोठा, तर दुसरा ६ वर्षांनी लहान; अशी आहे आशा भोसलेंची फिल्मी लव्ह लाइफ

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री नौशिन शाहने कंगना रनौतवर टीका केली आहे. यासोबतच कंगनाला इतरांबद्दल आदर नसल्याचेही तिने मुलाखतीत सांगितले आहे. सध्या अभिनेत्रीची मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडीओत नौशिनने कंगनाला भेटून तिच्या दोनदा कानाखाली मारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘हद कर दी विथ मोमीन साकिब’ या चॅट शोमध्ये पाकिस्तानी अभिनेत्रीने हजेरी लावली होती. कंगनाने आपल्या अभिनयावर, तिच्या कॉन्ट्रोव्हर्सीवर लक्ष द्यावे, सोबतच तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर ही लक्ष द्यावे, असे तिने मुलाखतीत सांगितले.

पाकिस्तानी अभिनेत्री ‘हद कर दी विथ मोमीन साकिब’ या चॅट टॉक शोमध्ये म्हणाली, “कंगना ज्याप्रकारे माझ्या देशाबद्दल काहीही हवं तसं बोलते, ज्याप्रकारे ती पाकिस्तानी सैन्याबद्दल काहीही बोलते, मी तिच्या धैर्याला सलाम करते. तिला काहीही समजत नाही. पण तरीही तिला देशाविषयी बोलायचे आहे. कंगनादेखील दुसऱ्या देशाची नागरिक आहे, ती भारतीय नागरिक नाही. तिने स्वत: च्या देशावर लक्ष द्यायला हवं. तिच्या अभिनयावर लक्ष द्यायला हवं. सोबतच तिने स्वत:च्या दिग्दर्शनाकडे, स्वत:च्या कॉन्ट्रॉवर्सीकडे आणि एक्स बॉयफ्रेंडकडे आणि इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे.”

Pakistani Actress Wants To Slap Kangana Ranaut
Jawan 1st Day Collection: ‘जवान’ची पहिल्याच दिवशी रग्गड कमाई, १० चित्रपटांच्या कलेक्शनचा रेकॉर्ड मोडीत

पुढे नौशीन म्हणाली की, “पाकिस्तानमध्ये लोकांना चांगली वागणूक देण्यात येते? तुला कसं काय माहित? तुला पाकिस्तानी आर्मीविषयी कशी काय माहिती आहे? तुला पाकिस्तानी एजन्सीविषयी कसं काय माहित?, आम्हाला त्याविषयी कोणतीही माहिती नाही,तुला कसं काय माहित?, एजंसी आमच्या देशात आहे, सेना आमच्या देशात आहे, पाकिस्तानी आर्मी आमच्यासोबत अशा गोष्टी कधीही शेअर करत नाहीत. या गोष्टी सीक्रेट असतात असं वाटत नाही का?”

Pakistani Actress Wants To Slap Kangana Ranaut
Mission Raniganj Teaser: 'मिशन राणीगंज'चा टीझर रिलीज, 'या' एका सीनवर यूजर्स झाले फिदा...

पुढे कंगनाचं कौतुक करताना नौशीन म्हणाली की, “कंगना एक खरंच खूप चांगली अभिनेत्री, उत्तम सौंदर्यवती आहे. मला माफ करा, या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय की, जेव्हा इतर लोकांचा आणि देशांचा आदर करण्याचा विचार येतो तेव्हा ती खूप वाईट आहे आणि एक अतिरेकी देखील आहे.”

सध्या कंगना प्रचंच चर्चेत आहे. ती ‘चंद्रमुखी २’ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत चित्रपटामध्ये अनेक दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार झळकणार आहेत. कंगनाचा येत्या १९ सप्टेंबरला ‘चंद्रमुखी २’ भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच कंगना ‘तेजस’ आणि ‘इमर्जन्सी’ मध्येही ती दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पी वासू करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com