Fawad Khan Movie: फवादचे भारत- पाकिस्तान संबंधांवर मोठे वक्तव्य, 'माझा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तर....'

'द लीजेंड ऑफ मौला जट्ट'च्या भारतातील प्रदर्शनाबाबत फवाद खानचे मोठे वक्तव्य केले आहे.
Fawad Khan Movie released In India
Fawad Khan Movie released In IndiaSaam Tv

The Legend Of Maula Jatt Release In India: पाकिस्तानचा सुपरस्टार फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांचा 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' या चित्रपटाची जगभरात चर्चा सुरू आहे. हा चित्रपट पाकिस्तानातील हा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने जगभरात चांगला गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचा कलाकार फवाद खान याने 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' भारतातील प्रदर्शनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून फवादच्या 'द लिजेंड ऑफ मौला जट्टो' भारतात प्रदर्शित होणार नाही, अशी चर्चा आहे. हा चित्रपट 30 डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाचे प्रदर्शन भारतात पुढे ढकलण्यात आले आहे.

Fawad Khan Movie released In India
Vidya Balan: टीका, वाद आणि अपयश: तरीही आज आहे चाहत्यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

माध्यमांना मिळालेल्या अहवालानुसार अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, 'झी स्टुडिओजकडे 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट'चे सगळे हक्क आहेत, त्यांना चित्रपटाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र चित्रपटातील काही सीनच्या विरोधामुळे या चित्रपटाचे भारतातातील प्रदर्शन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे.'

फवाद खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याची एक मुलाखत शेअर केली आहे. अभिनेता फवाद खानने हाँगकाँगमधील एका वाहिनीला ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान फवाद भारतातील 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' प्रदर्शनाविषयी बोलत आहे.

फवादला भारतात 'द लीजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार किंवा होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत फवाद म्हणाला की, 'कधी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे ऐकू येते, तर कधी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे ऐकायला मिळते. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील अशी अपेक्षा आहे.

'द लीजेंड ऑफ मौला जट्ट'मध्ये फवाद खान आणि माहिरा खानच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या दोघांच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. हा चित्रपट 1979 च्या कल्ट क्लासिक शीर्षक मौला जटचा आधुनिक पद्धतीने केलेला रिमेक आहे. फवादचा हा चित्रपट १३ ऑक्टोबरला पाकिस्तानात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com