HBD Pankaj Tripathi: मला ईश्वरने पाठवलय... पंकज त्रिपाठीनी चित्रपटात काम मिळविण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल

Pankaj Tripathi Struggle: पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या स्ट्रगलचे किस्से शेअर केले आहेत.
Pankaj Tripathi Birthday
Pankaj Tripathi BirthdaySaam Tv

Pankaj Tripathi Birthday Special:

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाच्या जोरावर पंकज यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. पंकज त्रिपाठी यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

बिहारमधील गोपालगंज या छोट्याशा जिल्ह्यातून आलेल्या पंकज त्रिपाठी एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. आज म्हणजे ५ सप्टेंबरला १९७६ साली पंकज त्रिपाठी यांचा जन्म झाला. आज त्याच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी.

Pankaj Tripathi Birthday
Aamir Khan Entry South Movie: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट दिसणार साऊथ चित्रपटांमध्ये? एका फोटोंवरून चर्चांना उधाण

पंकज त्रिपाठी यांना अभिनयाची आवड होती. पटना विद्यापीठात शिकत असताना ते नाटकांमध्ये भाग घेत असत. पटना विद्यापीठातून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. २ वर्ष त्यांनी या क्षेत्रात काम देखील केले. अभिनयाच्या ओढीने अखेर त्यांनी मुंबई गाठली.

२००४ साली फक्त ४६ हजार रुपये घेऊन पंकज त्रिपाठीसह मुंबईत आले. त्यानंतर सुरू झाला त्यांच्या बॉलिवूडमध्ये काम मिळविण्याचा खडतर प्रवास.

पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या स्ट्रगलचे किस्से शेअर केले आहेत. त्यांनी सांगितले की, ते जेव्हा स्ट्रगल करत होते तेव्हा तो ई-मेलचा काळ नव्हता. फोटो पाहिल्यानंतरच ऑडिशनसाठी बोलावले जायचे. त्यावेळी कास्टिंग डायरेक्टर देखील नसायचे. कामासाठी युनिटमधील लोकांशी संपर्कात राहावे लागायचे.

Pankaj Tripathi Birthday
Nagarjuna - Vijay Devarakonda: समांथा कुठेय ? नागार्जुनने विजय देवरकोंडाकडे केली सूनेची चौकशी

खूप प्रयत्न केल्यानंतर देखील त्यांना काम मिळणे नाही. मग पंकज त्रिपाठी यांनी प्रॉडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये जाऊन काम मागण्यास सुरुवात केली. ते तिकडे जायचे आणि सांगायचे मला ईश्वराने पाठवले आहे.

ईश्वरचे नाव घेतल्याने त्यांना ऑफिसमध्ये एन्ट्री मिळायची. पण जेव्हा ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांना 'कोण ईश्वर' असे विचारण्यात यायचे तेव्हा ते वरती आकाशाकडे हात करायचे. त्यांच्या या कृत्यामुळे अनेकजण त्यांच्यावर संतापायचे तर काही लोक त्यांच्या सेन्स ऑफ ह्युमरवर हसायचे. (Latest Entertainment News)

पंकज त्रिपाठी यांनी अभिषेक बच्चन यांच्या रन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप छोटी होती. पंकज यांनी खरी ओळख मिळाली ती 'गँग्ज ऑफ वासेपूर' या चित्रपटामुळे. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिले नाही.

फुकरे रिटर्न्स, लुक्काछिपी, बरेली की बर्फी, सुपर ३०, स्त्री, मिमी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी सेक्रेड गेम, आणि मिर्जापूर या वेबसीरीजमध्ये देखील काम केले आहे.

पंकज त्रिपाठी यांचा नुकताच OMG 2, हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर फुकरे ३ २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com