Parineeti Chopra – Raghav Chadha
Parineeti Chopra – Raghav Chadha Saam Tv

Parineeti Chopra आणि Raghav Chadha दोघेही आहेत उच्चशिक्षित, पण शिक्षणात कोण आहे वरचढ एकदा वाचाच!

Parineeti - Raghav Education : परिणीता चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Parineeti Chopra – Raghav Chadha) यांच्या नात्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे.

Parineeti Chopra – Raghav Chadha Education: बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या लगीनघाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवणी (Kiara Advani) विवाहबंधनात अडकली. त्यापाठोपाठ अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर के. एल राहुल (K L Rahul) यांनी लग्नगाठ बांधली. आता बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आहे.

Parineeti Chopra – Raghav Chadha
Brahmastra Sequel: ‘ब्रह्मास्त्र’चे पुढचे भाग येणार. एक नव्हे तर दोन.. पण तोपर्यंत तुमचं वय होईल...

परिणीता चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Parineeti Chopra – Raghav Chadha) यांच्या नात्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. दोघांचे एकत्र असल्याचे फोटो आणि व्हिडिओ तर सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहेत. अशामध्ये आता दोघांच्या साखरपुड्याची तारीख देखील फिक्स झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. परिणीती आणि राघव यांचे नातेसंबंध समोर आल्यापासून आता त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Parineeti Chopra – Raghav Chadha
Shekhar Suman: प्रियंकानंतर शेखर सुमननेही शेअर केला तो किस्सा; षडयंत्र करणाऱ्यांवर शेखर बरसले

परिणीती आणि राघव दोघेही आपापल्या प्रोफेशनमध्ये प्रसिद्ध आहेत. एकीकडे परिणीता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर दुसरीकडे राघव हे राज्यसभेचे खासदार आहेत. दोघेही उच्चशिक्षित आहेत. पण त्यांनी किती शिक्षण घेतले आहे आणि कोण कोणापेक्षा जास्त शिकले आहेत याबद्दल कोणाला माहिती नाही. तर आज आपण दोघांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत.

Parineeti Chopra – Raghav Chadha
Salman Khan New Song: 'लुंगी डान्स' नंतर 'उठा कारके लुंगी' गाणे होणार व्हायरल; 'किसी का भाई किसी की जान'मधील गाणे प्रदर्शित

परिणीतीच्या शिक्षणाविषयी सांगायचे झाले तर, अंबाला येथील शाळेतून तिने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने इंग्लंडच्या मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ऑनर्सची पदवी घेतली आहे.

तर, राघव यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर, राघव यांनी त्यांचे शालेय शिक्षण नवी दिल्लीतून पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. यासोबतच त्यांनी दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्समधून चार्टर्ड अकाउंटंट्सचे शिक्षण घेतले. एवढेच नाही तर त्यांनी देखील परिणीतीप्रमाणे परदेशातून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधूनही शिक्षण घेतले आहे.

Edited By - Priya Vijay More

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com