रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली; मी त्याला अनेकदा कपड्यांविना...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर काहींनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर काहींनी त्याचं कौतुकही केलं आहे.
Ranveer Singh and Parineeti Chopra
Ranveer Singh and Parineeti ChopraSaam Tv

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर काहींनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर काहींनी त्याचं कौतुकही केलं आहे. बॉलिवूड स्टारकडूनही त्याला पाठिंबा दिला जात आहे. बिनधास्त असलेल्या रणवीरनं अद्याप यावर काही प्रतिक्रिया दिली नसली तरी, 'ट्रोल'धाडीला त्याचे सहकारी कलाकार सडेतोड उत्तर देत आहेत. रणवीरची मैत्रीण आणि अभिनेत्री परिणीती चोप्राची(parineeti chopra) सध्या एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिनं असं काही सांगितलं की, हे ऐकून अनेकांना धक्का बसेल.

Ranveer Singh and Parineeti Chopra
Video: 'ती'च्या बर्थडेला सलमान खान पोहोचला, अन् मग काय चर्चा व्हायची ती झालीच!

सध्या परिणीती चोप्राची एक मुलाखत व्हायरल होत आहे. रणवीर सिंगच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ती जाऊ शकत नाही. रणवीरच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला खूप घाबरते, असं तिनं सांगितलं. त्याही पलीकडे परिणीतीने रणवीरबद्दलची अशी काही गोष्ट सांगितली की, त्याने सगळ्यांना धक्काच बसेल.

Ranveer Singh and Parineeti Chopra
Bigg Boss Marathi season 4 : बिग बॉस मराठीच्या घराचे दरवाजे लवकरच उघडणार!

परिणीती चोप्राने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिने रणवीर सिंगला अनेकवेळा कपड्यांविना पाहिलं आहे. परिणीतीनं रणवीरसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परिणीतीच्या डेब्यू सिनेमातही रणवीरने परिणीतीसोबत सह-अभिनेता म्हणून काम केले होते. परिणीतीने सांगितले होते की ती कोणाच्याही व्हॅनिटी व्हॅनमध्ये आरामात जाते. पण रणवीरच्या व्हॅनिटीमध्ये जाताना परिणीतीला विचार करावा लागतो, कारण रणवीर अनेकदा त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपड्यांशिवायच असतो. परिणीतीने सांगितले की, अनेकदा तिने रणवीरला कपड्यांशिवाय पाहिले आहे.

परिणीती चोप्राने असेही सांगितले की, एकदा ती मेकअप करत होती, त्यानंतर परिणीतीने मागे वळून पहिले, तेव्हा रणवीरने स्वतःची पॅंट काढली होती. परिणीती पुढे असं ही म्हणते की रणवीर सिंगला सार्वजनिक ठिकाणी त्याची पॅंट काढायला आवडते.

अभिनेता रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'सर्कस' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. रणवीरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सूरज बडजात्या दिग्दर्शित 'उंचाई' या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com