Pathaan Controversy: 'पठान'चित्रपटावर 'या' राज्यात बंदी, निर्मात्यांनी उचलले महत्वाचे पाऊल...

चित्रपटाला यापूर्वीही अनेक राज्यात विरोध झाला आहे. या सगळ्यानंतर बंगालमध्येही चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे.
Pathaan
Pathaan Saam Tv

Pathaan Controversy: शाहरुख खानचा 'पठान' रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. 'बेशरम रंग' या गाण्यामुळे हा चित्रपट बराच वादाच्या भोवऱ्यात सापडला. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांत शाहरुख खानच्या चित्रपटाला विरोध होत आहे. पण काही काळाने या चित्रपटातील गाण्याचा वाद शमला.चित्रपटाला यापूर्वीही अनेक राज्यात विरोध झाला आहे. या सगळ्यानंतर बंगालमध्येही चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे.

Pathaan
Nora Fatehi: सुकेशने नोराच्या आरोपांची केली पोलखोल, नोराच्या अडचणीत होणार वाढ?

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा 'पठान' चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ई टाइम्सच्या वृत्तानुसार 'पठान' चित्रपट बंगालच्या चित्रपटगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत आहे, त्यामुळे बंगाली चित्रपटांचे नुकसान होणार आहे.

Pathaan
SS Rajamouli: 'बाहुबली' दिग्दर्शक एसएस राजामौलींच्या जीवाला धोका, राम गोपाल वर्मांच्या दाव्याने खळबळ

बंगाली चित्रपटांच्या निर्मात्यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. बंगाली चित्रपट निर्मात्यांच्या मते, आमच्या भाषेतील चांगली कमाई करणारे चित्रपट रखडले आहेत. हे वितरण मॉडेल योग्य नाही. एवढेच नाही तर चित्रपट निर्माते कौशिक गांगुली म्हणतात, गरज पडल्यास सरकारलाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागेल आणि आम्हाला किमान 50 टक्के शो दिले जावेत, अशी मागणी यावेळी केली.

Pathaan
Athiya- K.L Rahul Wedding: अथिया- राहुलच्या ड्रेसची चर्चाच निराळी, ड्रेस मागील मेहनत ऐकाल तर चक्रावुन जाल...

जॉन अब्राहमचा चित्रपट 'पठान' उद्या म्हणजेच २५ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाची आतापर्यंत ४ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. आता बंगालमधील या वादाचा चित्रपटावर काय परिणाम होतो हे पाहावे लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com