
Pathaan: सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' चित्रपटाची सध्या सर्वत्रच चर्चा सुरू आहे. तब्बल एका आठवड्यातच ५०० कोटींचा पल्ला या चित्रपटाने सहज पार केला. चित्रपटाची प्री- बुकिंग देखील मोठे आकडे आपल्याला दाखवत होते. आता पर्यंत संपूर्ण जगभरात चित्रपटाने तब्बल ५५० कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. लवकरच 'पठान' चित्रपट १००० कोटींचा ही सहज पल्ला गाठू शकतो. परंतू इतके असले तरी, जगभरातील कमाईच्या बाबतीत ‘पठान’च्या पुढे अनेक भारतीय चित्रपट आहेत.
या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ३३५ कोटींचा पल्ला गाठला आहे. चित्रपटाला बऱ्याच प्रमाणात मिळालेल्या नकारानंतर चित्रपटाने बरीच चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने जगभरात एकूण ५५० कोटींच्या आसपास एकूण कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाने 'बाहुबली २' चा रेकॉर्ड मोडीत काढला होता. आता लवकरच ‘बाहुबली १’ ला मागे टाकणार असून ‘बाहुबली १’ने जगभरातून ५९९.७२ कोटींची कमाई केली होती.
‘पठान’ची जरी सध्या सर्वत्र चर्चा होत असली तरी जगभरातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत पहिला क्रमांक पटकावण्यासाठी चित्रपटाला अजून भरपूर कमाई करावी लागणार आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरातून २०२३.८१ कोटींचा गल्ला जमवला होता. तर त्या खालोखाल ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’, ‘आरआरआर’ या चित्रपटांचा क्रमांक लागतो. त्यामुळे आता ‘पठान’ या चित्रपटांना मागे टाकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शाहरुख तब्बल चार वर्षानंतर 'पठान' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ५० कोटींची तर जगभरात १०० कोटींची कमाई करत ओपनिंग केली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.