Pathaan: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'पठान'च्या निर्मात्यांनी उचलले टोकाचे पाऊल...

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' चित्रपटाला सोशल मीडियावर बराच ट्रोलिंग सामना सध्या करावा लागत आहे.
Pathaan Controversy
Pathaan Controversy Saam Tv

Pathaan: सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' चित्रपटाला सोशल मीडियावर बराच ट्रोलिंग सामना सध्या करावा लागत आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत शाहरुख दीपिकासह जॉन अब्राहम दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील गाण्यांना नेटकरी बरेच ट्रोल करत आहेत. अख्ख्या चित्रपटाला गाण्यांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 'बेशरम रंग' गाण्याला दीपिकाच्या बिकिनीवरुन ट्रोल केले जात आहे तर दुसऱ्या गाण्यालाही नेटकरी आता ट्रोल करीत आहेत.

Pathaan Controversy
Pathaan Controversy: 'पठान'वादावर आशा पारेख स्पष्टच बोलल्या, 'स्वत:ला पुरोगामी विचाराचे म्हणतात ना?...' म्हणत केली नेटकऱ्यांवर टिका...

चित्रपटावर प्रदर्शनापुर्वीच बहिष्कार टाकण्याची मागणी ट्रोलर्स करत आहेत. हा चित्रपट येत्या आगामी वर्षात २५ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. परंतु त्याआधीच गाण्यांवरुन वादाचे सत्र सुरु आहे.

चित्रपट प्रदर्शनापुर्वीच त्याचे ओटीटी राईट्स करोडोंमध्ये विकले गेले आहेत. त्यामुळे ही शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक गुड न्युजच म्हणावी लागेल. चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडणे ही पहिली वेळ नाही. दीपिकाचे जितके चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडतात, त्यांची चांगली कमाई ही होतेच असे नेटकऱ्यांचे मत आहे.

Pathaan Controversy
Malaika Arora: मलायकाच्या लेकाची शोमध्ये हजेरी, कपड्यावरुन लेकानेही आईला झापले...

मिळालेल्या माहितीनुसार, 'पठान' मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतू सध्या मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या डिजीटल स्ट्रिमिंगच्या राईट्ससाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटीने काही करोडोंमध्ये राईट्स रिझर्व्ह करुन ठेवले आहेत. शाहरुख आणि दीपिकाच्या 'पठान' चित्रपटाचा वाद काही संपायचा नाव घेत नाही.

Pathaan Controversy
Anil Kapoor's Birthday: सोनमनं वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नातवासोबतच्या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले

चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनीला विरोध हिंदूत्ववादी संघटनांसह अनेक राजकीय नेतेही करीत आहेत. 'पठान'चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचे अनेक जणांचे मत आहे. बऱ्याच प्रेक्षकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. एकीकडे लोक चित्रपटाला विरोध करत आहेत, तर दुसरीकडे काहींनी याचे समर्थनही केले आहे.

Pathaan Controversy
Amitabh Bachchan: बिग बींना आयुष्यात उंचीच नडली, हॉटसीटवरील स्पर्धकासमोर व्यक्त केली खंत...

'पठान' चित्रपटासाठी प्रेक्षक बरेच आतूर असून हा चित्रपट तब्बल 250 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च पाहता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा सध्या तरी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना आहे. यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई केली आहे. आता या वादातून 'पठान' ला कितपत फायदा होणार हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com