Pathaan
Pathaan Saam Tv

Pathaan Trailer Out: गाण्यांपेक्षा ट्रेलर दमदार; अवघ्या काही मिनिटातच पार केला लाखो व्ह्यूजचा टप्पा...

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठान'चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.

Pathaan Trailer Out: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठान'चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. बराच काळ प्रेक्षकांचा उत्साह वाढवल्यानंतर निर्मात्यांनी अखेर मंगळवारी चित्रपटाचा दमदार आणि जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या 'बेशरम रंग' या गाण्यावरुन सर्वत्र बराच वाद झाला होता. सेन्सॉर बोर्डाने काही सीन्स काढून टाकल्यानंतर चित्रपटाला यूए प्रमाणपत्र मिळाले.

Pathaan
Bigg Boss 16: चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखची अनोखी शक्कल, 'या' कार्यक्रमातून करणार प्रमोशनचा श्रीगणेशा...

२५ जानेवारीला 'पठान' संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे. यशराज बॅनर अंतर्गत बनलेल्या 'पठान'मध्ये शाहरुख व्यतिरिक्त दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदने पेलली आहे.'पठान' हा 2023 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चार वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर शाहरुख खान रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Pathaan
Gautami Patil Dance Show: गौतमी पाटीलने कार्यक्रम मधेच थांबवला, तरुणाच्या कृत्याने आयोजक हैराण

अँक्शन आणि रोमान्सने 'पठान' चा ट्रेलर व्यापून टाकला आहे. शाहरुख आणि दीपिका दोघेही ट्रेलर मध्ये भरपूर ॲक्शन करताना दिसत आहेत. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळत आहे. या दोघांशिवाय जॉन अब्राहम विलनच्या भूमिकेत असून त्याचाही लूक या ट्रेलरमधून दिसत आहे. चित्रपटात एकूणच रोमान्स, कॉमेडी, ॲक्शन असा संपूर्ण मसाला 'पठान'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. या ट्रेलरची उत्सुकता सर्वांनाच असल्याने अल्पावधीतच लाखोंचा टप्पा पार केला आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहमच्या अभिनयाचा आणि ॲक्शनचा मिलाप चाहत्यांना अनुभवता येणार आहे. शाहरुख आणि दीपिका या दोघांची ही केमिस्ट्री आधी गाण्यातूनही दिसली आणि आता ट्रेलरमधूनही दिसून येत आहे. उत्तम VFX तंत्रज्ञानामुळे 'पठान'चा ट्रेलर आणखीच आकर्षक दिसून येत आहे. आशुतोष राणा, डिंपल कपाडिया अशा कलाकारांची सिनेमात विशेष भूमिका दिसत आहे.

Pathaan
Urfi Javed Tweet: उर्फी जावेदनंं चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं, ट्विट करताना सर्वच मर्यादा ओलांडल्या

चित्रपट निर्मात्यांनी रणनीती आखत ट्रेलरपूर्वी चित्रपटातील गाणे प्रदर्शित केले. या चित्रपटातील पहिले गाणे 'बेशरम रंग' हे प्रदर्शित झाले होते. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे सर्वत्रच मोठा वाद झाला होता. गाण्यात शाहरुख खानने हिरव्या रंगाचा शर्ट घातला असून दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली होती. त्यांच्या डान्ससह गाण्यावर आणि कपड्यांवर देशभरातील हिंदुत्व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com