Pathan Day 4: 'पठान' चित्रपटाची जगभरात यशस्वी घोडदौड, चौथ्या दिवशी केली विक्रमी कमाई

'पठान'ने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई करून बॉलिवूड चित्रपटांचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
Pathaan 4th day collection
Pathaan 4th day collectionSaam Tv

Pathan Box Office Collection Day 4: शाहरुख खानच्या 'पठान' बॉक्स ऑफिसवर जबदस्त कामगिरी केली आहे. बॉयकॉट ट्रेंडचा बळी ठरलेला हा चित्रपट चालेल का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यात भर म्हणजे देशभरात होणाऱ्या विरोधाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. अखेर अनेक संकटे पार करून हा चित्रपट प्रदर्शित झाला.

'पठान' चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे चार दिवस झाला आहेत. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिस चमकत दाखवली आहे. 'पठान' चित्रपटाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 4 दिवसांत 220 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने शनिवारी जगभरात चांगलाच गल्ला जमवला आहे. चला तर मग 'पठान'च्या कलेक्शनवर एक नजर टाकूया.

Pathaan 4th day collection
Rakhi Sawant Mother Death: राखीच्या आईच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल; 'या' सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या सर्वांनी मिळून बॉलिवूडची झालेली हानी भरून काढण्याची जबाबदारी जणू घेतली होती, असे या चित्रपटाचे कलेक्शन पाहून वाटत आहे. 'पठान'ने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई करून बॉलिवूड चित्रपटांचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. दुस-या दिवशी त्याने 200 कोटींचा टप्पा ओलांडला. तिसऱ्या दिवशी 300 कोटींचा आकडा पार केला आणि चौथ्या दिवशी सुद्धा या चित्रपटाने चमत्कार केला आहे.

'पठान'ने शनिवारी 400 कोटींचा आकडा पार केला आहे. तर काळ या चित्रपटाचे देशातील बॉक्स ऑफिस कलेक्शन ५१.५० कोटी इतके होते. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 55 कोटी, दुसऱ्या 68 कोटी आणि तिसऱ्या 38 कोटीची कमाई केली आहे. शाहरुखच्या या चित्रपटाने चार दिवसात तिसऱ्यांदा नवीन रेकॉर्ड बनविला आहे. 'पठान' चित्रपटाने 'चेन्नई एक्सप्रेस'चा पाचव्या दिवसशीच रेकॉर्ड मोडलं आहे.

शाहरुख खान भारतासह जगातील इतर देशांमध्येही लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटाद्वारे शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. त्याने चित्रपटाला यश मिळाले यासाठी अनेक प्रयत्न केले. टीव्ही आणि लाइव्ह शोऐवजी शाहरुखने थेट त्याच्या चाहत्यांही ट्विटरद्वारे संवाद साधला हे. आस्क एसआरके या सेगमेंटच्या माध्यमातून शाहरुख त्याच्या चाहत्यांशी संवाद साधायचा. ही पद्धत त्याच्या कामी आली.

'पठान'मध्ये सलमान खानचाही कॅमिओ आहे. शाहरुख खानला ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी रसिक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. त्यामुळे वीकेंडच्या अखेरीस हा चित्रपट 500 कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे. एकूणच हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचण्याच्या दिशेने पठाणची वाटचाल सुरू आहे आणि त्याचा वेग आता थांबताना दिसत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com