
Pathaan Leaked in HD: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पठान' २५ जानेवारीला रिलीज झाला आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. त्यामुळे या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी निर्मात्यांना आशा आहे. शाहरुखचा (Shah Rukh Khan) हा कमबॅक चित्रपट मानला जात आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
दरम्यान बॉलिवूडमधील (bollywood) अनेक चित्रपटांना गेल्या काही महिन्यांपासून बॉयकॉटचा सामना करावा लागत आहे. पठानचं बेशरम रंग हे गाणं रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आहे. अनेक संघटनांनी त्यातील काही दृष्यांवर आक्षेप घेतला होता, तसेच ती वगळण्याची मागणी देखील केली होती. अखेर आज हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु पठान रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी निर्मात्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही वेबसाइटवर पठान एचडीमध्ये लीक झाला आहे.
सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याचं आवाहन
पठानच्या निर्मात्यांनी आणि स्टार कास्टने अँटी-पायरसीविषयी बोलताना चित्रपट केवळ सिनेमागृहातच जाऊन पाहावा असे आवाहन केले होते. विशेष म्हणजे पठानच्या रिलीजपूर्वीच त्याच्या सर्व शोचे मोठ्या प्रमाणात अडव्हान्स बुकिंग झाले आहे. असे असले तरी पहिल्याच दिवशी काही वेबसाइटवर हा चित्रपट लीक झाला आहे. या वेबसाईटने अवैधरित्या पठान लीक केला आहे.
टाइम्सनाऊच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट फिल्मीझिला (Filmyzilla) आणि फिल्मीफोरव्हॅप (Filmy4Wap) या वेबसाईटवर अवैधरित्या उबलब्ध करण्यात आला आहे. एका वेबसाइटने या फिल्म व्हर्जनला 'camrip' म्हटले आहे, तर दुसऱ्या साईटने त्याला 'pre-DVD rip' असे म्हटले आहे. हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्टार कास्ट आणि निर्मात्यांकडून आधीच प्रेक्षकांना चित्रपट केवळ सिनेमागृहातच जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.