
Pathan 1st Day Collection : शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत 'पठान' चित्रपट बुधवारी 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पठान बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल अशी अपेक्षा आधीच वर्तवली जात होती, तसंच काहीसं झालं आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी पठानने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पठानचं ओपनिंगच्या कलेक्शन काय आहे जाणून घेऊया.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठानने नॅशनल चेन्स थिएटरमध्ये रात्री 8.15 वाजेपर्यंत 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अशा प्रकारे पठान या चित्रपटाने 'वॉर', 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' आणि 'केजीएफ'चे ओपनिंग डे कलेक्शन रेकॉर्ड मोडले आहेत.
तरण आदर्श यांनी ट्वीट करत सांगितल की, शाहरुखच्या पठानने PVR मध्ये 11.40 कोटी, INOXमध्ये 8.75 कोटी, Cinepolis मध्ये 4.90 कोटींचं कलेक्शन केलं आहे. अशाप्रकारे पठानने आतापर्यंत या थिएटर चेनमधून 25.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनचे हे आकडे रात्री 8.15 वाजेपर्यंतचे आहेत.
'वॉर'ने पहिल्या दिवशी 19.67 कोटी रुपये, 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'ने 18 कोटी आणि 'केजीएफ'ने 22.15 कोटी रुपये कमावले होते. अशा प्रकारे पठानने पहिल्याच दिवशी या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे.
शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांसारखे स्टार्स पठान सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख खानची रॉ एजंटची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे.जॉन अब्राहम सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.