
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) आज (१७ सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यानिमित्त देशासह जगभरातील सर्वच क्षेत्रांतील मान्यवर मंडळींकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींकडूनही पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतनेही मोदींना आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया (Social Media)पोस्टद्वारे कंगनाने मोंदीना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये कंगनाने पंतप्रधान मोदींसोबतचा तिचा 'हॅण्ड शेक' करतानाचा फोटो शेअर केला आहे. यासह तिने नरेंद्र मोदींना 'सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व' असंही म्हटलं आहे. कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
कंगनाने तिच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं की, 'माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.',लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यापासून ते या पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्व असा तुमचा प्रवास अविस्मरणीय आहे.'
"आम्ही तुम्हाला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो, तुम्ही गांधी, कृष्णा आणि रामाप्रमाणे शतायुषी व्हाल...अशी आशा आहे. तुम्ही या राष्ट्राच्या हृदयावर नाव कोरले आहे. तुमचे कार्य आणि तुमचा वारसा कोणीही सहज हटवू शकत नाही. यामुळेच मी तुम्हाला 'अवतार' म्हणून संबोधित करते आहे. आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही आमचे नेते आहात," असंही कंगनानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर, अभिनेत्री कंगना रणौत आगामी चित्रपट इमर्जन्सीमुळे चर्चेत आहे. चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यासह चित्रपटात श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, अनुपम खेर आणि मिलिंद सोमण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. कंगना रणौत सध्या 'इमर्जन्सी' चित्रपटात व्यग्र आहे. ती स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. याशिवाय कंगना रणौत अनेक चित्रपटांचा भाग असणार आहे. धाकड या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.