Pathaan Movie: PM मोदींनी केला 'पठान' चित्रपटावर कौतुक वर्षाव, म्हणाले 'चित्रपट हाऊसफुल्ल झाला...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पठान' चित्रपटाचे कौतुक केले आहे.
PM Narendra Modi Praised Pathaan Movie
PM Narendra Modi Praised Pathaan MovieSaam Tv

PM Modi Appreciated Pathan Movie: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट जगभर धुमाकूळ घालत आहे. आता संसदेतही या चित्रपटाची चर्चा होत आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पठान' चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटामुळे श्रीनगरमधील सिनेमा जगतात बदल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'पठान' जगभरातील सर्वात जास्त कमी करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. बॉलिवूडला गेले काही महिने बॉक्स ऑफिसवर खूपच कठीण गेले. पण 'पठान'मुळे बॉलिवूडमध्ये एक नवीन जोश पाहायला मिळत आहे.

'पठान' चित्रपटाने 'केजीएफ' चित्रपटाचे अंतिम कलेक्शनचा आकडा पार केला आहे. तर फक्त भारतातर या चित्रपटाने ४५० करोडपेक्षा जास्त कमाई केली आहे.

PM Narendra Modi Praised Pathaan Movie
Sridevi Biography: 'श्रीदेवी- द लाइफ ऑफ ए लीजेंड' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, खुद्द बोनी कपूर यांनी केली घोषणा

जम्मू-काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीविषयी बोलताना पीएम मोदी म्हणाले, 'श्रीनगरमध्ये अनेक वर्षांनंतर चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे.' शाहरुखच्या फॅन क्लबने पीएम मोदींच्या भाषणाचा हा भाग ऑनलाइन शेअर करत चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा केले आहे. एसआरके युनिव्हर्सने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, '#श्रीनगरमधील थिएटर्स अनेक दशकांनंतर हाऊसफुल्ल झाली आहेत ब्लॉकबस्टर #पठाणबद्दल बोलताना पंतप्रधान @narendramodi म्हणतात...'

शाहरुखच्या 'पठान' निमित्ताने काश्मीर मधील श्रीनगर येथील INOX राम मुन्शी बाग थियेटर तब्बल ३२ वर्षांनी हाउसफुल झालं. 'पठान' पाहण्यासाठी काश्मीर मधील नागरिकांनी तीन दशकांनंतर हाउसफुल्ल गर्दी केली. काश्मीर सारख्या संवेदनशील ठिकाणी 'पठान' हाऊफुल्ल होणं ही फार मोठी गोष्ट होती. मोदींनी याच गोष्टीचा उल्लेख करत शाहरुखच्या 'पठान' चित्रपटाचे कौतुक केले आहे.

पठान'च्या संपूर्ण देशभर प्रदर्शची करण्यात आला. यामुळे लॉकडाऊन दरम्यान बंद पडलेले २५ सिंगल-स्क्रीन थिएटर पुन्हा सुरू होण्यास मदत झाली आहे. यशराज फिल्म्सच्या सूत्रांचे म्हणणे आहे की प्रॉडक्शन हाऊस थिएटर पुन्हा सुरू करण्यास प्रवृत्त करत आहे तसेच त्यांना पाठिंबा देत आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान पीएम मोदींनी आपल्या मंत्र्यांना चित्रपटाच्या तोडफोडीचे समर्थन करू नका आणि पठान'ला रिलीज होऊ द्या असे सांगितले.

'पठान' चित्रपटाला हिंदू संघटना आणि भाजप नेत्यांनी विरोध केला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नेत्यांना सुनावले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील 'आधी चित्रपट बघ मग विरोध करा',असे म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com