अमिताभ बच्चन, शाहरूख, अजय देवगण, रणवीर सिंहविरोधात कोर्टात खटला

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंग अडचणीत सापडले आहेत.
Amitabh Bachchan, Ajay Devgn,Shahrukh khan
Amitabh Bachchan, Ajay Devgn,Shahrukh khansaam tv

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shahrukh khan), अजय देवगण (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer singh) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटखा ब्रॅंडचं प्रमोशन केल्याप्रकरणी मुझप्परपुर येथील समाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशम यांनी या अभिनेत्यांविरोधात पोलिसांत तक्रार केलीय. त्यामुळे बॉलिवूडचे हे सुपरस्टार अडचणीत सापडले आहेत.

Amitabh Bachchan, Ajay Devgn,Shahrukh khan
काँग्रेसचं पुन्हा 'चिंतन'; सर्व राज्यांचे मंत्री आणि नेत्यांना बैठकीला बोलावणार

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंह यांच्यावर ४६७,४६८,४३९ आणि १२० ब या कलमांतर्गत (police FIR filed) गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. आपल्या लोकप्रियतेचा गैरवापर करुन पैशांसाठी गुटख्याची जाहीरात करत असल्याचा आरोप या अभिनेत्यांवर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी न्यायलयात २७ मे रोजी होणार आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली होती. तंबाखूच्या जाहिरातीबाबत त्याने त्याच्या सर्व चाहत्यांची माफी मागितली होती. तंबाखूच्या जाहिरातीवरुन नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केलं होतं. या प्रकरणाबाबत बोलताना अक्षय म्हणाला होता, मी कधीही तंबाखूला प्रोत्साहन दिलं नाही आणि यापुढेही देणार नाही. मी या जाहिरातीतून माघार घेत आहे. माझ्या करारामध्ये काही कायदेशीर बाबी आहेत, त्या पूर्ण होईपर्यंत ही जाहिरात प्रसारित करत राहील. विमल इलायचीच्या जाहिरातीवर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो. जाहिरातीतून मिळालेला सगळा पैसा मी एका चांगल्या कामासाठी खर्च करेन.मी माझी पुढील कामं काळजीपूर्वक निवडून त्यात उत्तम काम करण्याचा प्रयत्न करेन.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com